आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्‍ये पुन्‍हा पोस्‍टर वॉर, मोदींना दिली 'खाष्‍ट सासूची' उपमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींसमोरील अडचणी कमी होण्‍याऐवजी वाढतच चालल्‍या आहेत. संजय जोशींना भारतीय जनता पक्षातून वेगळे करण्‍यात आल्‍यामुळे जोशी समर्थक आता मोदींच्‍या मागे हात धुवून लागले आहेत.
गुजरातच्‍या रस्‍त्‍या-रस्‍त्‍यांवर आता पुन्‍हा एकदा मोदींविरोधात पोस्‍टर दिसू लागले आहेत. या पोस्‍टरमध्‍ये मोदींना गुजरातची सासू असल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे. या पोस्‍टरवर हिंदी चित्रपटातील सर्वात वाईट सासूंची भूमिका केलेल्‍या अभिने‍त्रींना दाखवण्‍यात आले आहे. या अभिनेत्रींबरोबर मोदींचाही फोटो लावण्‍यात आला आहे.
या पोस्‍टरवर बंडखोर नेता केशूभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेला यांच्‍या दरम्‍यानच्‍या संघर्षाचीही नोंद केली आहे. पोस्‍टरमध्‍ये मोदींवर अनेक आरोप करण्‍यात आले असून यामध्‍ये सर्वात गंभीर आरोप हा गुजरातमध्‍ये फूट पाडल्‍याचा आहे. मोदींवर भाजपमध्‍ये फूट पाडल्‍याचा देखील आरोप करण्‍यात आला असून शेवटी आता सांगा, मोदी गुजरातची खाष्‍ट सासू आहेत ना ! असे लिहिले आहे.
यापूर्वी अहमदाबादपासून दिल्‍ली, लखनौ पर्यंतच्‍या रस्‍त्‍यांवर असेच पोस्‍टर दिसून आले होते. त्‍याचबरोबर नरेंद्र मोदींच्‍या मेहसाना जिल्‍ह्यातही मोठया प्रमाणात पोस्‍टरबाजी करण्‍यात आली होती. जेथे-जेथे मोदींच्‍या विरोधात पोस्‍टर दिसतात, तेथे भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांकडून ती फाडली जातात.
संजय जोशींचा लवकरच धमाका?
नरेंद्र मोदी होते अबू जुंदलच्‍या निशाण्‍यावर
बोल इंडिया बोल : मोदी - नितीशकुमार वाद, कोण ठरणार वरचढ