आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरलेल्या दबंगच्या सिक्वेलकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर दबंग-2 मध्ये प्रकाश राज आणि सलमान खान यांच्यातील जुगलबंदी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. निर्माता अरबाज खानने मंगळवारी हे स्पष्ट केले आहे.
प्रकाश राज दबंग-2 चे मुख्य खलनायक असतील, असे अरबाजने ट्विटरवरून सांगितले. प्रकाश राज हे अत्यंत हुशार अभिनेते आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 44 वर्षीय राज यांनी हिंदीबरोबरच तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे.
अलीकडेच सिंघम चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप स्तूती झाली. वाँटेडमध्येही त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले. आगामी चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर दबंगमधील खलनायक सोनू सुदने या सिक्वेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली होती. त्यापाठोपाठ अरबाजने हा खुलासा केला आहे. अॅक्शन, कॉमेडीचा हा सिक्वेलमधून अरबाजने निर्माता म्हणून आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अरबाज पटकथाकार - दबंगची चर्चा त्यातील गाणी, कलाकार, संकलन यामुळे जेवढी झाली. तेवढीच चित्रपटाच्या संहितेमुळेही झाली. दबंगची पटकथा सलमानने लिहिली होती. परंतु आता दबंगची पटकथा अरबाज लिहिणार आहे. अगोदरच्या पटकथेमध्येही अरबाजच्या अनेक कल्पना होत्या. तो पटकथेत जबरदस्त जान आणतो, असे सलमानने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.