आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranabda Meet Balasaheb Thakare On July 13 In Mumbai

प्रणव मुखर्जी १३ जुलैला बाळासाहेब ठाकरेंची भेट घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एनडीएसोबत असतानाही त्यांच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेने काँग्रेस व युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी मुखर्जी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेने समर्थन जाहीर केल्याने शिवसेनेचे विशेषत बाळासाहेबांचे आभार व्यक्त करण्यासाठी मुखर्जी 13 जुलैला मुंबईत येणार आहेत. त्या दरम्यान मुखर्जी बाळासाहेब ठाकरे यांची भेट त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुखर्जी यांचे नाव पुढे येताच 19 जून रोजी राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदा योग्य उमेदवार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना त्यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. याअगोदर प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना फोन करुन पाठिंब्या देण्यासाठी विनंती केली होती. पीटीआयने ही शक्यता वर्तवली असली तरी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान या भेटीला काँग्रेसने महत्त्व दिले आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणवदांचा अर्ज भरताना सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिले गेले होते. मात्र, काँग्रेसने शिवसेनेकडे दुर्लक्ष करून त्यांची नाराजी ओढवून घेतली होती. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेकडे १८ हजाराहून अधिक मते आहेत. तरीही काँग्रेसने शिवसेनेची दखल घेतली नसल्याचे राजधानीत चित्र होते. शिवसेनेने एनडीएच्या विरोधात जाऊन यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला असतानाही त्यांचा अर्ज भरताना मात्र शिवसेनेचा एकही प्रतिनिधी दिल्लीत दिसला नव्हता. कारण काँग्रेसने शिवसेनेला व त्यांच्या कोणत्याही नेत्याला आमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला तोंडावर पाडले अशी टीका दिल्लीसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला होती. मात्र याचा जास्त गाजावाजा होताच काँग्रेसला आता यावर पडदा टाकायचा आहे व प्रणवदांच्या निवडीचा मार्ग सोपा करायचा आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कलामांच्या 'टायमिंग'वर शिवसेनेची टीका, मिसाईल मॅन नव्हे 'भंपक कलाम'
चलाख राजकारणी (अग्रलेख)
सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची तयारी केली होती - कलाम