आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Files Affidavit In Apex Denies Allegations

राहुल गांधींनी बलात्‍काराचे आरोप फेटाळलेः सर्वोच्‍च न्‍यायालयात शपथपत्र सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी अपहरण आणि बलात्‍काराचे आरोप फेटाळले आहेत. समाजवादी पार्टीच्‍या माजी आमदाराने त्‍यांच्‍यावर अमेठी येथील एक मुलीचे अपहरण करुन बलात्‍कार केल्‍याचा आरोप लावला आहे. यासंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या नोटीशीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी शपथपत्र सादर करुन आरोप फेटाळले.
समाजवादी पार्टीचे आमदार किशोर समरिते यांनी राहुल गांधी यांच्‍यावर हा आरोप लावला आहे. त्‍यांनी याप्रकरणाची चौकशी करण्‍याची मागणी केली आहे. सर्वप्रथम त्‍यांनी अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्‍यायालयाने त्‍यांची याचिका फेटाळली. याशिवाय त्‍यांच्‍याचविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. खोटे आरोप लावल्‍यावरुन त्‍यांना 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. या निर्णयाला समरिते यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले आहे. न्‍यायालयाने एप्रिल 2011 मध्‍ये राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश शासनाला नोटीस पाठवून उत्तर देण्‍यास सांगितले होते.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात शपथपत्र सादर करुन आरोप फेटाळताना म्‍हटले आहे की, माझ्याविरोधातील आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. माझी समाजातील प्रतिमा मलिन करण्‍याचा यामागे हेतून आहे. याप्रकरणाला राजकीय रंग देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. अशा खोट्या याचिकाकर्त्‍यावर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणीही त्‍यात राहुल गांधींनी केली आहे.
राहुल गांधींची जादू ओसरली? युवा कार्यकर्त्यांची संख्या घटली‍
PHOTOS:राहुल गांधींना पडला \'वॅरोनिका\'चा विसर?
देशाचे \'मोस्ट इलिजिबल बॅचलर\' राहुल गांधी यांची दुर्मिळ छायाचित्रे