आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून लोकपालची हत्या- राहुल गांधी यांची टिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: भाजपने लोकपालची हत्या केल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी मंगळवारी एका प्रचार सभेत बोलताना केली. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याची तरतूद सरकारने विधेयकात केली होती त्यामुळे भाजपने हे कृत्य केल्याचे राहुल गांधी म्हणाले. मजबूत लोकपाल हे काँग्रेसचे स्वप्न आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनात राज्यसभेत हे विधेयक पारित केले जाईल असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर त्यांनी सपा आणि बसपावर टीका केली. दोन्ही पक्षांचे राज्यात सरकार होते, पण त्यांनी आरक्षण देण्याचा विचार केला नाही. उत्तर प्रदेशसाठी राहुल गांधीनी ‘ व्हिजन 2020 ’दस्तऐवज तयार केला आहे. निवडणूक जाहीरनाम्यापेक्षा ते वेगळे असून आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आदींचा त्यात समावेश आहे.
पंजाबच्या सत्तेसाठी कसरत करणा-या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. या रणधुमाळीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग हे उतरणार असले तरी राज्याच्या कानाकोपºयात राहुल हेच सक्रिय दिसून येतील.
निवडणुकीची रणनिती तयार करणाºया पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, पंजाब राज्यातील वेगवेगळ्या भागात एकूण नऊ जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. या सभांना राहुल हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभा तीन ते चार दिवसांत आयोजित केल्या जाणार आहेत. त्यात ब्रॅण्ड राहुलच्या नावावर मोठ्या प्रमाणात तरूणांना जमवण्याची तयारी केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या तरी चार व पंतप्रधान तीन सभांना संबोधित करण्याची पक्षाची योजना आहे. या सभा मालवा, मांझा, दोआबा येथे होणार आहेत. सभेचे ठिकाण, वेळ या गोष्टी एक-दोन दिवसांत निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी अगोदर दिग्गजांची बैठक होणार आहे. त्यात या विषयीचा निर्णय घेतला जाईल. 16 जानेवारी रोजी नाम निर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच या तीन स्टार प्रचारकांनी प्रचार मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, केंद्रिय मंत्री विरभद्र सिंह, गुलाम नबी आझाद यांनाही या प्रचारात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. मुकुल वासनिक, राज बब्बर यांनाही पंजाबमध्ये प्रचारासाठी पाठवले जाणार आहे. निवडणूक आयोगाने 19 हजार 700 हून अधिक निवडणूक केंद्रांच्या सुरक्षिततेच्या योजनेला अंतिम रूप देण्यास सुरवात केली आहे.
लोकपाल विधेयक पारित करण्यासाठी विशेष अधिवेशनाची भाजपकडून मागणी