आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलचा आदेश मिळाल्यास प्रचार -प्रियंका गांधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ, रायबरेली - प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात प्रचार करण्यास तयार आहेत. परंतु काँग्रेस सरचिटणीस असलेले बंधुराज राहुल गांधींचा आदेश आला तरच.
मंगळवारी निवडणूक प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांनी सांगितले की,राहुलच्या सांगण्यावरूनच मी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काम करीत आहे. यापुढेही तो सांगेल त्याच ठिकाणी काम करेन. मी आणि राहुल अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देऊ.
मंगळवारी राहुल बुंदेलखंडच्या झांसी व ललितपूरमध्ये तर त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी उत्तराखंडमध्ये प्रचार सभा घेत होत्या. रायबरेलीतील आपल्या दुस-या दिवसाच्या मुक्कामात प्रियंका म्हणाल्या की, राहुलची मेहनत वाया जाणार नाही.उत्तर प्रदेशात काँग्रेसच सरकार बनवेल.

महिलांनी रस्ता रोखला
मुशिंगंजहून रायबरेलीला जाताना रस्त्यात शिना होम टेक्स्टाइल प्रा.लि.च्या महिला कामगारांनी प्रियंका गांधींचा रस्ता अडवला होता. या महिलांनी बंद पडलेली फॅक्टरी सुरू करा अशी विनंती केली . नाराज महिलांकडे पाहून प्रियंका म्हणाल्या, फॅक्टरी चालू होईल. पण एवढ्या दिवसांनी आले आहे तर एकदा हसा तर खरं. त्यावर सर्वच महिला खळाळून हसल्या.