आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Unhappy Because Of Not Getting Married

'सोनिया आणि राहुल गांधींमध्‍ये मतभेद'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेसचे 'युवराज' राहुल गांधी यांच्‍यावर नेम साधला आहे. लग्‍न न झाल्‍यामुळे राहुल गांधी दुःखी असल्‍याचा टोला भाजपने लगावला आहे. पक्षाचे मुखपत्र 'कमल संदेश'च्‍या नुकत्‍याच प्रकाशित झालेल्‍या अंकातून राहुल गांधींवर टीका करण्‍यात आली आहे. उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करणा-या राहुल गांधींना काहीच फायदा होत नसल्‍याचे या अंकातून म्‍हटले आहे.
मुखपत्राच्‍या संपादकीय लेखात म्‍हटले आहे, उत्तर प्रदेशात राहुल गांधींची जादू दिसत नाही. तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे ते उत्तर प्रदेशातील प्रचारादरम्‍यान वारंवार सांगत असतात. याचा अर्थ ते मनमोहन सिंग यांच्‍यासारख्‍या वयस्‍क राजनेत्‍यांना निवृत्तीचा सल्‍ला देत आहेत. राहुल गांधींचा हा इशारा मनमोहन सिंग यांना कळायला हवा.
एवढेच नव्‍हे तर मुखपत्राने राहुल आणि सोनिया गांधींमध्‍ये तीव्र मतभेद निर्माण झाल्‍याचा दावा केला आहे. कॉंग्रेसच्‍या एका वरीष्‍ठ नेत्‍याचे हे प्रताप असल्‍याचे 'कमल संदेश'ने म्‍हटले आहे. एकीकडे कॉंग्रेस अडचणी सोडविण्‍यात व्‍यस्‍त आहे. तर लग्‍न होत नसल्‍यामुळे राहुल गांधी दुःखी आहेत.
भाजपचेही अनेक बडे नेते अविवाहीत आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी, मध्‍य प्रदेशच्‍या माजी मुख्‍यमंत्री उमा भारती या नेत्‍यांनी लग्‍न केलेले नाही.
भाजपकडून लोकपालची हत्या- राहुल गांधी यांची टिका
उत्तर प्रदेशात राहुल गांधीच्या मदतीला प्रियंका राजकीय मैदानात
उत्तर प्रदेशातील संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्ट : राहुल
राहुल गांधींच्‍या समजूतदारपणाची परीक्षा घेणारे वर्ष