आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान अप्रामाणिक, आयपीएलमध्‍ये दाऊदचा पैसाः रामदेव बाबांचा हल्‍लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुंझुनूः योग गुरु रामदेव बाबा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍यावर कडाडून हल्‍लाबोल केला. मनमोहन सिंग हे अप्रामाणिक असल्‍याचा आरोप केला. मनमोहन सिंग यांचे सरकार लाचार असल्‍याची टीका करुन सरकारने काळ्या पैशावर सादर केलेल्‍या श्‍वेतपत्रिकेची खिल्‍ली उडविली, अशी टीकाही त्‍यांनी केली. रामदेव बाबांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्‍यावरही टीकास्‍त्र सोडले. राजस्‍थानच्‍या झुंझुनू येथे एका योगशिबिरात ते बोलत होते.
रामदेव बाबा यांनी सरकारवर टीका करताना सांगितले, केंद्र सरकार परदेशात अडकलेला काळा पैसा आणण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. परंतु भ्रष्टाचा-यांना संरक्षण देण्याचे काम मात्र प्रामाणिकपणे करत आहे. पंतप्रधानांवर थेट हल्‍ला चढवून रामदेवबाबा म्‍हणाले, पंतप्रधान अमेरिकेला विकल्‍या गेले आहेत. परदेशी कंपन्‍यांनीही त्‍यांना विकत घेतले आहे. भांडवलदारांकडून त्‍यांना 10 हजार कोटी रुपये देतात, असे आरोप केले. रामदेव बाबांनी खनिकर्म क्षेत्रात होत असलेल्‍या भ्रष्‍टाचाराकडे लक्ष वेधून प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग यांच्‍यावर टीका केली. अर्थमंत्री तर मायनिंगचे नावच घेत नाहीत. कारण पंतप्रधानांच्‍या नाकाखाली 10 लाख 67 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्‍याचे सांगण्‍यात आले. परंतु, हा घोटाळा तर 200 लाख कोटी रुपयांचा आहे. देशाच्या पंतप्रधानाच्या नाकाखाली २०० कोटी रुपयांचा घोटाळा होतो तो पंतप्रधान प्रामाणिक कसा, असा सवाल बाबा रामदेव यांनी केला आहे.
बाबा रामदेव यांनी परदेशी बँकांमध्ये ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणण्याची पुन्हा एकदा मागणी केली. असे केल्यास देशातल्या नक्षलवादासह बहुतांश समस्या सुटतील. कारण नक्षलवादी शस्त्र खरेदीसाठी काळा पैसा वापरत असल्याचे ते म्हणाले.
रामदेव बाबांनी आयपीएलकडे मोर्चा वळवून या स्‍पर्धेत गँगस्‍टर दाऊद इब्राहीमचा पैसा गुंतल्‍याची टीका केली. आयपीएल ही खेळाची स्पर्धा नसून भ्रष्टाचार आणि लाचलुचपतचे व्यूहचक्र असल्याचे म्हटले आहे. आयपीएलमध्ये मगरीच्या रुपातल्या नेत्यांनीच पैसा लावला असल्यामुळे सरकार त्यांना पाठिशी घालत असल्याचे म्हटले.
कोळशावरून संसदेत कोलाहल; 10.67 लाख कोटींचा खाण महाघोटाळा
कोळसा खाणींच्‍या परवान्‍यावरुन संसदेत गदारोळ, कामकाज स्‍थगित
मला जाळले तरी मी माझे वक्तव्य बदलणार नाही - रामदेव बाबा