आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशातील काळा पैसा परत आणण्‍यासाठी ग्रामसभा ते लोकसभेपर्यंत लढाई-रामदेव बाबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अण्‍णा हजारे आणि रामदेव बाबा दिल्‍लीतील जंतर मंतर येथे रविवारी लाक्षणिक उपोषण करत आहेत. विदेशातील काळा पैसा परत आणणे आणि मजबूत लोकपालच्‍या मागणीसाठी एक दिवसाचे उपोषण ते करीत आहेत. विदेशातील काळा पैसा परत आणण्‍यासाठी ग्रामसभे पासून लोकसभेपर्यंत लढाई लढण्‍यात येणार असल्‍याचे रामदेव बाबांनी मंचावरून म्‍हटले आहे. या उपोषणासाठी गर्दी ही भाडयाने आणलेल्‍या लोकांची नसल्‍याचा टोलाही त्‍यांनी लगावला.
दिवसभर रामदेव बाबांबरोबर मंचावर अण्‍णा हजारे असणार आहेत. टीम अण्‍णांचे सदस्‍य अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनिष सिसोदिया आणि गोपाळ रावसुद्धा सामील झाले आहेत. तत्‍पूर्वी, अण्‍णा हजारे आणि रामदेव बाबा यांनी पहिल्‍यांदा राजघाटला जाऊन महात्‍मा गांधीच्‍या समाधीला श्रद्धांजली वाहिली. मोठया संख्‍येने समर्थक येणार असल्‍याचा दावा रामदेव बाबांनी केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी फक्‍त पाच हजार लोकांनाच उपोषणस्‍थळी येण्‍यास परवानगी दिल्‍याचे म्‍हटले आहे. एक वर्षापूर्वीही रामदेव बाबांनी रामलीला मैदानावर उपोषण केले होते. यावेळी संसद मार्गावर मुख्‍य मंच बनवण्‍यात आला आहे, तसेच मंचावर मोठयाप्रमाणात सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्‍यात आले आहे.
मोठया संख्‍येने समर्थक येण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे पोलिसांनी एक दिवसापूर्वीच पोलिस बॅरेकेटिंग लावून कडक सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात केली आहे. मंचाशिवाय येथे व्‍हीआयपी लोकांना येण्‍याजाण्‍यासाठी वेगळा मार्ग, माध्‍यमांना उभे राहण्‍यासाठी वेगळया स्‍थानासह सर्व तयारी करण्‍यात आली आहे.
एक दिवसाच्‍या या उपोषणासाठी दिल्‍ली पोलिसांनी सुरक्षेसाठी पाच हजार जवान तैनात केले आहेत. त्‍याचबरोबर अर्धसैनिक बलाच्‍या 20 कंपनीसुद्धा तैनात केल्‍या आहेत. शनिवारपासूनच संसद मार्गावर पोलिसांचा पहारा आहे. भीषण उकाडयामुळे पाण्‍याच्‍या पाऊचची तसेच रूग्‍णवाहिकेचीदेखील सोय करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर समर्थकांच्‍या सुविधेसाठी मोठया सहा स्‍क्रीनसुद्धा लावण्‍यात आल्‍या आहेत.
संध्‍याकाळी सहा वाजता उपोषण संपेल. त्‍यानंतर रात्री आठपर्यंत ठिकठिकाणी रॅली, मशाल मोर्चा काढण्‍यात येणार आहे. अण्‍णा आणि रामदेव बाबा एकाच मंचावर उपोषण करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. एप्रिल आणि ऑगस्‍टमध्‍ये अण्‍णांनी केलेल्‍या उपोषणामध्‍ये मंचावर रामदेव बाबा पाठिंबा देण्‍यासाठी पोहोचले होते. PHOTOS: रामदेव बाबा आणि अण्‍णा हजारेंचे भ्रष्‍टाचार-काळ्यापैशाविरोधातील उपोषण सुरू जे मौलाना करू शकत नाही ते करणार रामदेव बाबा लोकपालसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा - अण्णा हजारे