आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdev reaches muslims say he will do what maulanas cant

जे मौलाना करू शकत नाही ते करणार रामदेव बाबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रामदेव बाबांनी मुसलमानांशी जवळकिता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. आपल्‍या पुढच्‍या रॅलीमध्‍ये मुसलमानांचे मुद्दे उठवण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शनिवारी दिल्‍ली येथे मुस्लिम समुदायाशी झालेल्‍या बैठकीत त्‍यांनी मुस्लिम समाजाला हे आश्‍वासन दिले. 'तुमचे मौलाना जेथे आवाज उठवू शकत नाही तिथे हा बाबा तुमचा आवाज बनेल', अशी ग्‍वाही रामदेव बाबा यांनी यावेळी दिली.
ऑल इंडिया युनायटेड मुस्लिम मोर्चाद्वारे इंडिया इस्‍लामिक कल्‍चर सेंटर येथे आयोजित परिषदेत बोलताना त्‍यांनी गरीब मुसलमानांना अनुसूचित जातीमध्‍ये आरक्षण मिळण्‍याची वकिलीदेखील केली. त्‍याचबरोबर सरकारमध्‍ये मुसलमानांची भागीदारी वाढली पाहिजे, असे त्‍यांनी म्‍हटले.
रामदेव बाबा पुढे म्‍हणाले, 'लोक म्‍हणतात की मी योगगुरू आहे. भगवे कपडे घालतो आणि मुसलमानांच्‍या मुद्यांवर विश्‍वास ठेवत नाही. जे असे म्‍हणतात, त्‍यांनी पतंजली योगपीठात येऊन पाहावे. तिथे हिंदु-मुसलमान असा भेद नाही. सरकारी नोकरीतही असेच झाले पाहिजे. नेत्‍यांनी आपल्‍यात फूट पाडली आहे. त्‍यांचा उद्देश आपल्‍याला निष्‍फळ करावा लागेल.'
आगामी आंदोलनात सगळयांना बरोबर घेऊन जायचे आहे. त्‍यासाठी चार जून रोजी होणा-या उपोषणासाठी उर्दूमध्‍ये बॅनर लावण्‍यात येणार आहेत, अशी माहितीही त्‍यांनी यावेळी दिली. रामदेव बाबांनी यावेळी लष्‍करप्रमुख जनरल व्‍ही.के सिंह यांना निवृत्तीनंतर काळया पैसा आणि भ्रष्‍टाचार विरोधात सुरू असलेल्‍या आंदोलनात येण्‍याचे आवाहन केले.
रामदेव बाबा करणार मुसलमानांशी चर्चा