आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मेश्‍वर सिंह यांच्‍यावर झाडल्‍या 40 गोळ्या, भोजपूरमध्‍ये संचारबंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणाः बिहारच्‍या 'रणवीर सेना'चे संस्‍थापक ब्रह्मेश्‍वर सिंह उर्फ बरमेसर मुखिया यांची गोळी घालून हत्‍या करण्‍यात आली. आज पहाटे अज्ञात हल्‍लेखोरांनी भोजपूर जिल्‍ह्यातील आरा येथे त्‍यांच्‍यावर गोळीबार केला. हल्‍लेखोर मोटरसायकलवर होते. या घटनेनंतर बिहारमध्‍ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोजपूर जिल्‍ह्यात संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे.
ब्रह्मेश्‍वर सिंह सकाळी फिरायला घराबाहेर पडले. त्‍याचवेळी हल्‍लेखोरांनी डाव साधला. ब्रह्मेश्‍वर यांच्‍यावर तब्‍बल 40 गोळ्या झाडण्‍यात आला. या घटनेनंतर आरा येथे रणवीर सेनेचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी संतापाच्‍या भरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड सुरु केली. हजारोंच्‍या संख्‍येने कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरले आहेत. हत्‍या झाली त्‍या स्‍थळापासून जवळच्‍या एका हरिजन वसतीगृहाला आग लावण्‍यात आली. याशिवाय काही ठिकाणी रस्‍ते आणि रेल्‍वे वाहतूकही आंदोलनकर्त्‍यांनी रोखून ठेवली आहे. तसेच काही सरकारी कार्यालयांनाही पेटवून देण्‍यात आले. प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्‍काळ संचारबंदी लागू केली आहे. पूर्व बिहारमध्‍ये अलर्टही जारी करण्‍यात आला आहे. भोजपूर आणि आरा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ब्रह्मेश्‍वर यांच्‍या हत्‍येनंतर बिहारमध्‍ये पुन्‍हा हत्‍यासत्र सुरु होण्‍याची भीतीही व्‍यक्त करण्‍यात येत आहे.
सिंह यांच्‍यावर अनेक गंभीर गुन्‍ह्यांचे आरोप होते. काही प्रकरणात त्‍यांना शिक्षा झाली. नुकतेच ते जन्‍मठेपेची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आले होते.
बिहारचे माजी मुख्‍यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. रणवीर सेनेचे समर्थक आणि कायकर्ते सिंह यांचा मृतदेह उचलू देण्‍यास विरोध करीत आहेत. मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी तात्‍काळ घटनास्‍थळी भेट देण्‍याची मागणी करण्‍यात येत आहे.
ब्रह्मेश्‍वर सिंह यांनी बिहारमधील जातीसंघर्षाच्‍या काळात उच्‍च जातींच्‍या हितासाठी रणवीर सेनेची स्‍थापना केली होती. त्‍यानंतर 1980 ते 1990 या दशकामध्‍ये झालेल्‍या अनेक नरसंहाराच्‍या घटनांमध्‍ये रणवीर सेनेचाच हात असल्याचे जानले जाते. ब्रह्मेश्‍वर सिंह यांना बथानी टोला नरसंहार प्रकरणातून उच्‍च न्‍यायालयाने दोषमुक्त केले होते. या निर्णयावर विविध स्‍तरातून टीकाही करण्‍यात आली होती.
फक्त २७७ हत्या अन् २२ नरसंहार, ब्रह्मेश्‍वर उर्फ मुखियाची कहाणी...
नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक