आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधवेवर बलात्‍कार करून बनवला एमएमएस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाच्‍या राजधानीत महिलांवरील अत्‍याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोटला मुबारकपूर येथील तरूणाला एका विधवा तरूणीस लग्‍नाचे अमिष दाखवून तिच्‍यावर बलात्‍कार करून त्‍याचा एमएमएस बनवल्‍याच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली आहे.
पीडित महिला ही लजपत नगर येथील एका मोबाईल शोरूममध्‍ये काम करते. आरोपीचे नाव रोहन असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. पीडित महिला ज्‍या शोरूममध्‍ये काम करते तिथे रोहन कायम खरेदीसाठी जायचा. यादरम्‍यान दोघांमध्‍ये मैत्री झाली. रोहनने महिलेस वैष्‍णव देवीला नेले. तिथे त्‍याने एका हॉटेलमध्‍ये तिला अंमली पदार्थ पिण्‍यास देऊन तिच्‍यावर बलात्‍कार केला, व त्‍याची मोबईलवरून क्‍लीपसुद्धा बनवली. दिल्‍लीला परत आल्‍यानंतर रोहनने ती व्हिडिओ क्‍लीप त्‍या महिलेला दाखवून तिच्‍याशी वारंवार शाररिक संबंध ठेवले. यावरच तो न थांबता तिच्‍याकडून त्‍याने एक लाख 70 हजार रूपयेदेखील लुटले.
शेवटी त्‍या पीडित महिलेने याची तक्रार कोटला मुबारकपूर येथील पोलिस चौकीत नोंदवली. महिलेच्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी रोहनला अटक केली आहे.
प्रेमविवाह करून पुण्यातील अल्पवयीन मुलीस विकले कुंटणखान्यात!