आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape In Police Station At Badau In Utter Pradesh

पोलिस ठाण्‍यातच तरुणीवर बलात्कार; बाहेर पहारा देण्यात पोलिस होते गुंग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बदायू येथील पोलिस ठाण्यातच एका तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पीडित तरुणीवर ठाण्‍यात बलात्कार करत असताना त्याचा मित्र अर्थात पोलिस कर्मचारी ठाण्‍याबाहेर पहारा देत होता. आरोपीसह पोलिस कर्मचार्‍याला अटक झाली आहे. या मुदद्यावरून विरोधी पक्षाने विधानसभेत गोंधळ घातला. राज्यात कायदा व सुव्यस्थेचे तीनतेरा वाजले असून रक्षकच जनतेच भक्षक झाले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत येथील बडे सरकार दर्ग्यात नवस फेडण्‍यासाठी आली होती. रात्री ती दर्ग्याबाहेर कुटुंबियासोबत झोपली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास संबंधीत तरूणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्‍यात आले होते. लालपूर पोलिस ठाण्‍यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ठाण्‍यात बलात्कार होत असताना आरोपीचा मित्र अर्थात पोलिस कर्मचारी ठाण्‍याबाहेर पहारा देत होता, असेही पिडित तरूणीने सांगितले. प‍िडित तरूणीची वैद्यकीय तपासणी झाली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी गोपाल आणि त्याचा मित्र पोलिस कर्मचारीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्‍यात आला आहे.
अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यात अपहरण आणि बलात्कारांच्या घटनेत वाढ झाली आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी लावला आहे. उत्तरप्रदेश विधानसभेचे बजेट सत्र सोमवारी सुरू झाले. त्यात राज्यपाल यांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी पोलिस ठाण्‍यातील बलात्काराचा मुद्दा उकरून काढला. बसपाचे आमदारांनी घोषणाबाजी करून पोस्टर दाखविले. राज्यात गुंडाराज आले असल्याचे आरोपही त्यांनी लावला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज स्थगित करण्‍यात आले.
दरम्यान, मुंबईत अशाच प्रकारची घटना घडली होती. सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे त्याची व्हिडिओ क्लिपही तयार केली होती. अनिल महाबोले असे या अधिकार्‍याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मुंबईतील एसीपीने गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार
मित्राच्या मदतीने पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार
शिक्षिकेच्या पतीचा शिक्षकाच्या पत्नीवर बलात्कार