आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा. स्व. संघ म्हणतो, 'येडियुरप्पा हे नापास स्वयंसेवक !'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भ्रष्टाचारातील सहभागामुळे रा. स्व. संघ लज्जित झाला आहे, अशी प्रतिक्रिया संघाच्या एका
वरिष्ठ नेत्याने दिली आहे. कर्नाटकात भूखंड घोटाळा केल्याच्या आरोपाखाली माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
येडियुरप्पा यांच्या अलिकडच्या प्रकरणामुळे संघाला लज्जित केले आहे. जेव्हा ते येथील संघ मुख्यालयात यायचे तेव्हा एक स्वयंसेवक म्हणून त्यांना सल्ला देण्यात आला होता. त्यांनी सल्ला गांभीर्याने घेतला नसेल तर त्याचे खापर संघावर फोडणे चुकीचे असल्याचे मत संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले आहे.संघ करणार आंदोलन
सरकारचे प्रस्तावित दंगलविरोधी विधेयक हे हिंदूविरोधी आहे. त्यामुळे त्याविरोधात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 20 दिवशीय आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी होईल, अशी माहिती होसबाळे यांनी यावेळी दिली. तसेच पुढील वर्षीच्या 12 जानेवारीपासून संघातर्फे स्वामी विवेकानंद यांचा 150 वा जयंती समारोह देशभर साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.