आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कारणांमुळे सचिनचा खासदारपदाचा निर्णय चुकलाच ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नीता आणि मुकेश अंबानी यांनी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार झालेल्या सचिन तेंडूलकर आणि त्याच्या कुटूंबासाठी रविवारी विधु विनोद चोपडाचा आगामी चित्रपट 'फेरारी की सवारी'च्या खास स्क्रिनींगचे आयोजन केले होते. दरम्यान, अशीही अफवा आली की, क्रिकेटचे मैदान आणि संसदेनंतर सचिन आता बॉलिवूडमध्येही नशिब आजमावणार आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होत आहे की, सचिनची खासदार पदाची कारकीर्द यशस्वी होणार की नाही, की खासदार पदाबाबतचा त्याचा निर्णय चुकला ?
सचिनपेक्षा त्याची बॅट जास्त बोलकी
सचिन तेंडूलकर त्यांच्या बोलण्यामुळे नाही तर त्याच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. मैदानात किंवा मैदानाबाहेरही तो फारसा बोलताना दिसत नाही. मितभाषी हीच त्याची ओळख आहे. त्यामुळे वादग्रस्त मुद्यावर तर तो अतिशय कमी बोलतांना दिसतो. मॅच फिक्सिंग सारख्या मुद्यावरही त्याने केवळ दोन वेळेस भाष्य केले आहे. एकदा दक्षिण अफ्रिकेत न्यूज चॅनलशी तर दुस-यावेळेस एका नियतकालीकाशी.
माध्यमांच्या मुलाखतीतही सचिन केवळ त्याच्या जनसंपर्क अधिका-यांने पास केलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देतो. सार्वजनिक आयुष्यात सक्रिय व्यक्तीने प्रत्येक मुद्यावर मोकळेपणाने मत व्यक्त करणे अपेक्षित असते. जसे अमिर खान, नर्मदा बचाव अंदोलनापासून गुजरात दंगलीपर्यंत सर्व मुद्यांवर मोकळेपणाने चर्चा करतो. सचिनचे कमी बोलणे जर संसदेतही कायम राहीले तर त्याच्या खासदारपदाचा कोणालाच काही फायदा होणार नाही. मग या खासदारकीचे करायचे काय, असा प्रश्न कायम राहतो.

अनेक कंपन्यांचा ब्रँड अम्बेसिडर
खासदार सचिन तेंडूलकर अनेक कंपन्यांचा ब्रँड अम्बेसिडर आहे. त्यातील काही वादग्रस्त देखील आहेत. सचिन ब्रँड अम्बेसिडर असलेल्या कोको कोला कंपनी विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. केरळपासून बनारस आणि जयपूरमध्ये अजूनही आंदोलने सुरु आहेत. अशा वेळेस राज्यसभेत या कंपनीबद्दल प्रश्न उपस्थित झाला तर, सचिन कोणती भूमिका घेणार आहे ?

क्रिकेट की संसद
सचिनने शपथविधीनंतरच स्पष्ट केले की, तो क्रिकेटमुळे येथे पोहचला आहे आणि यापुढेही क्रिकेट खेळत राहाणार आहे. त्यासोबतच तो जाहिराती देखील करणार आहे. आता चर्चा आहे की, तो चित्रपटांमधुनही झळकणार आहे. त्यामुळे यासर्व क्षेत्रात काम करत असतांना तो संसदेला किती वेळ देणार आहे ?
VIDEO : सचिन तेंडुलकर खासदार झाल्यावर काय म्हणाला, पाहा...
सचिन आणि अंजलीची प्रेम कहाणी, पाहा व्हिडिओ...
राज्यसभेत सचिन-रेखा