आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदानंद गौडा देणार राजीनामा, जगदीश शेट्टार होणार कर्नाटकचे नवे मुख्‍यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः कर्नाटकमध्‍ये पुन्‍हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मुख्‍यमंत्री बी. एस. येडियुरप्‍पा यांच्‍या राजकीय दबावतंत्राला यश आले आहे. विद्यमान मुख्‍यमंत्री सदानंद गौडा हे पायउतार होण्‍यास तयार झाले आहेत. आज सायंकाळपर्यंत ते राजीनामा देतील. नवे मुख्‍यमंत्री म्‍हणून जगदीश शेट्टार यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले आहे.
भाजपच्‍या कोर समितीची आज दिल्‍लीत बैठक झाली. त्‍यात कर्नाटकच्‍या पेचप्रसंगावर चर्चा करण्‍यात आली. बैठकीमध्‍ये शेट्टार यांच्‍या नावावर नवे मुख्‍यमंत्री म्‍हणून शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. बैठकीसाठी सदानंद गौडा हे आज सकाळीच दिल्‍लीला रवाना झाले होते.
येडियुरप्‍पा यांना अवैध उत्‍खननप्रकरणी लोकायुक्तांनी ठपका ठेवल्‍यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्‍यानंतर सदानंद गौडा यांचे नाव त्‍यांनीच पुढे केले होती. परंतु, न्‍यायालयाने येडियुरप्‍पा यांना दिलासा दिल्‍यानंतर ते पुन्‍हा मुख्‍यमंत्री पदावर बसण्‍यासाठी प्रयत्‍न करु लागले. त्‍यासाठी त्‍यांनी प्रचंड दबाव आणला होता. त्‍यांच्‍या समर्थक मंत्र्यांनीही तीन दिवसांपूर्वी राजीनामे दिले होते. अखेर त्‍यांच्‍या दबावतंत्राला यश आले आहे.
कर्नाटक : येडियुरप्पा समर्थक 9 मंत्र्यांचे राजीनामे मागे
भाजप संकटात : गुजरातमध्ये बंडाचा झेंडा
बेळगावप्रकरणी महाराष्‍ट्रातील भाजप नेत्‍यांचे मौन का? राज ठाकरेंचा सवाल