आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सलमान रश्दी भारतात आले तर त्यांचे बुटाने स्वागत करु'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- जयपूर लिटरेचर फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. पण आयोजकांनी सलमान रश्दी येणार की नाही याबाबत चुप्पी साधली आहे. ते आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहेत की, रश्दी २० आणि २१ जानेवारीला येणार नाहीत. पुढे यायचे की नाही हे रश्दी यांनीच ठरवावे. पण रश्दी यांनी भारतात पाऊल ठेवण्याआधीच येथील मुस्लिम समाजाने त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. मुस्लिम संघटनांनी म्हटले आहे की, जर रश्दी भारतात आले तर त्यांचे स्वागत चप्पल-बुटांनी करु. मात्र आयोजकांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्दी भारतात २३, २४ तारखेला येण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारनेही रश्दी प्रकरणाबाबत कोणतेही पाऊल उचलेले नाही. तसेच हे प्रकरण राज्य सरकारांनी हाताळावे, असे सांगितले आहे.
मात्र आयोजक रश्दीच्या उपस्थितीसाठी अडून बसले आहेत. त्यातच राज्य सरकारला सूचना दिल्याने स्थानिक प्रशासन व कायदा व्यवस्था संभाळण्याचे मोठे काम राजस्थान सरकारला करावे लागणार आहे.
रश्दींच्या येण्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत झालेल्या चर्चेत व्यक्त केली होती. गहेलोत यांनी व्यक्त केलेले मत आणि काही समाजघटकांना रश्दी यांच्याबद्दल असणा-या आक्षेपामुळे अलर्ट जारी करण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले.
ऑल इंडिया मुस्लिम मजलिस-ए-मुशवरचे प्रमुख डॉ. जफारुल इस्‍लाम खान यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जर सलमान रश्दी भारतात येणार असतील तर त्यांचे स्वागत बुटाने केले जाईल. तुमच्या संघटनेने तस्लिमा नसरीनवर हल्ला करण्याचे जाहीर केले होते त्याचप्रमाणे रश्दी यांच्यावर हल्ला करणार का, असे विचारला ते म्हणाले, रश्दींना भारतात येण्यास आमचा कायमच विरोध राहील जर ते आलेच तर त्यांचे स्वागत बुटाने, चप्पलाने केले जाईल.
दरम्यान, जयपूरमध्ये रश्दीच्या विरोधात प्रदर्शन मुस्लिम संघटनांनी थांबविले असून आयोजकांनी रश्दी येणार नसल्याचे त्यांना आश्वासन दिले आहे.
सेटॅनिक व्हर्सेस’मुळे मुस्लिम धर्मगुरूंची नाराजी ओढवून घेतलेले ब्रिटिश लेखक सलमान रश्दी जयपूर लिटररी फेस्टिव्हलला उपस्थिती लावणार की नाही, याबाबत अनिश्चितता व उत्सुकता कायम आहे. आजपासून सुरू झालेल्या या साहित्याच्या उत्सवासाठी इतरही अनेक भारतीय व अभारतीय दिग्गज लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. सलग पाच दिवस चालणा-या या उत्सवात अतिशय भरगच्च कार्यक्रम आहेत
सर्वांसाठी (रश्दींसह) खुले- या उत्सवाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे येथे सर्वांना खुले आमंत्रण असते. विशेष अतिथींसाठी विशेष पास वगैरे नसतो. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला तुमच्या शेजारच्या खुर्चीवर आधीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असलेला वक्ता असू शकतो. मागच्या वर्षी एक रिक्षावाला उत्सवाला आला होता. त्याला विचारले की इकडे तू का आलास, तर तो म्हणाला, ‘मी असं ऐकलंय की इकडे गोष्टी सांगतात. मी माझ्या मुलांना शाळेत पाठवू शकत नाही की पुस्तकं आणून देऊ शकत नाही. मग इकडे गोष्टी ऐकून त्यांना सांगू तर शकतो!’ म्हणजेच, सलमान रश्दी येणार अथवा नाही, त्यांना संरक्षण हवेच, हा व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, हे जे म्हणणे आहे ते खरेच आहे. परंतु त्याव्यतिरिक्तही जेएलएफमध्ये बरेच काही आहे आणि त्याची झलक तुम्हाला रोज मिळत राहणार आहे, एवढेच! दैनिक भास्करने भास्कर भाषा या प्रकल्पांतर्गत या उत्सवातील काही कार्यक्रमांना मदत केली आहे.
रश्दी जेएलएफला येणार की नाही?
सलमान रश्दी जयपूरला येणार!
लेखक सलमान रश्दी प्रकरणी घोळ सुरूच