आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman rushdie No Entry At India Jaipur Ashok Gahlot

लेखक सलमान रश्दी प्रकरणी घोळ सुरूच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वादग्रस्त भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्या जयपूर साहित्य समारंभातील सहभागावरून अजूनही अनिश्चितता कायम आहे. रश्दी यांच्या आगमनावरून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
रश्दी यांचा व्हिसा रद्द करण्यात यावा, अशी मागणी दारुल उलूमने केली आहे. परंतु भारतात येण्यासाठी आपल्याला व्हिसाची गरज नाही, असे रश्दी यांचे म्हणणे आहे. जयपूर येथे 20 ते 24 जानेवारीदरम्यान साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी रश्दी भारतात येणार होते. दुसरीकडे रश्दी यांचा नियोजित 20 रोजीचा भारत दौरा रद्द झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
जयपूरच्या या समारंभाच्या वेबसाइटवर अजूनही रश्दी यांचे नाव वक्त्यांच्या यादीत दिसत आहे. आयोजकांकडून नेमकी स्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. रश्दी यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण परत मागवण्यात आलेले नाही, असेही आयोजक म्हणत आहेत. निमंत्रण परत घेण्याविषयी केंद्र किंवा राज्य सरकारकडून आपल्यावर कोणताही दबाव नाही, असे आयोजक संजय रॉय यांनी सांगितले.
दुसरीकडे मुख्यमंत्री गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गेहलोत म्हणाले, रश्दी भारतात येत आहेत किंवा नाही, याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. तसा कोणताही संदेश अद्याप मिळालेला नाही. स्थानिक लोकांना सलमान रश्दी येऊ नयेत, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही राज्य सरकारला कायदा व सुव्यवस्थेत झालेला बिघाड आवडणारी नसतो. केंद्र सरकारला स्थानिक लोकांचे मत आहे, याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी रश्दी अनेक वेळा खासगी दौºयासाठी भारतात आले आहेत. 2007 मध्ये ते जयपूर येथील साहित्य महोत्सवात सहभागीदेखील झाले होते.