आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर - भंवरी देवीचे पती अमरचंद यांनी सीबीआय चौकशीत खळबळजनक माहिती दिली आहे. 'भंवरी देवीला मलखानच्या घरातील सर्वजण मलखानची 'घरवाली' म्हणूनच ओळखत होते, मी केवळ नावालाच नवरा होतो. मलखानशी तिचे अनेक वर्षांपासून संबंध होते. मलखानची मुले तिला आई आणि बहिणी वहिनी म्हणत.', अशी माहिती अमरचंद यांनी दिली आहे. यामुळे मलखानसमोरील अडचणींत भर पडली आहे.
अधिका-यांच्या बदल्या भंवरी देवीच्या माध्यमातून होत असत. यानिमित्ताने अलीकडच्या काळातच तिची मदेरणा यांच्याशी ओळख झाली होती. परंतु, मलखान यांच्यासोबतचे तिचे संबंध मात्र जुने होते. भंवरी देवी नेहमी जयपूरला जायची आणि मदेरणा मार्फत बदल्या करवून घ्यायची. तिने मलखान आणि मदेरणा या दोघांची सीडी बनवली होती. परंतु त्या सीडीज् कोठे आहेत याची माहिती नाही, असे अमरचंद यांनी सीबीआयला सांगितले आहे.
मदेरणाशी संबंध असल्याचे जुलैमध्ये कळाले - अमरचंद यांनी सीबीआयला सांगितले की, '२३ जुलै रोजी टीव्हीवर कॅबिनेट मंत्र्याच्या सेक्स कांडाची बातमी सुरु होती, तेव्हा मी भंवरीच्या शेजारीच बसलो होतो. त्याच वेळी तिला टीव्ही पाहा असे सांगणारा एक फोन आला. नंतर भंवरी हिने सोहनलाल याला फोन करून सांगितले की ही बातमी तिनेच दिली आहे.' तेंव्हाच भंवरीने अमरचंदला सांगितले की, तिचे मंत्री महिपाल मदेरणा यांच्याशीही शारीरिक संबंध आहेत.
भंवरी देवी प्रकरण : राजस्थानच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे; सीबीआयने आवळले पाश
भंवरी सेक्स सीडी : मदेरणांची हकालपट्टी; समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला, गहलोतही धोक्यात
भंवरी सेक्स सीडी : राजकारण्यांचा काळा चेहरा पाहा छायाचित्रांतून
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.