आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad pawar backtracks on demand for apolitical presiden

दिल्लीत जाताच राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत शरद पवारांचे घूमजाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भावी राष्ट्रपतीपदासाठी राजकीय व्यक्तीऐवजी अराजकीय व समाजातील आदर्श व्यक्तीची निवड केल्यास योग्य ठरेल, असे रविवारी मुंबईत वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत त्याबाबत घूमजाव केले. त्यांनी आता म्हटले आहे की, मी फक्त सर्वसहमतीने उमेदवार निवडावा असे म्हटले होते.
पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बिगर राजकीय उमेदवारासंबंधी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी असे म्हटले नाही. मी राजकीय किंवा बिगर राजकीय असे न बोलता सर्वसहमतीचा उमेदवार निवडल्यास योग्य होईल, असे म्हटले होते. कारण सध्या संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) व राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांना विचारत घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण हे वक्तव्य केले. मात्र आपण राजकीय किंवा अराजकीय उमेदवाराबाबत मत व्यक्त केले नव्हते, असे घूमजाव पवार यांना करावे लागले आहे.
डॉ. अब्‍दुल कलाम पुन्‍हा राष्‍ट्रपती होणार?
विधानसभा, लोकसभा निवडणुका राष्ट्रवादी- काँग्रेस एकत्रच लढवेल - शरद पवार