आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार हे अविश्वासू आणि बेभरवशाचे- अर्जुनसिंगांच्या पुस्तकात टीकास्त्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी नेते शरद पवार हे अविश्वासू, बेभरवशाचे व धोकेबाज असल्याचे काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुन सिंग यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. तसेच शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा मुद्दा मांडत काँग्रेस पक्षातील नियम व परंपरा मोडल्यानंतर आपल्याला धक्का बसला होता, असाही खुलासा सिंग यांनी पुस्तकात केला आहे.
‘अ ग्रेन सॅण्ड इन अवरग्लास ऑफ टाईम’ हे अर्जुनसिंग यांच्या आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूपश्चात लवकरच प्रसिध्द होत आहे. अर्जुनसिंग यांचे गतवर्षी 4 मार्च रोजी निधन झाले. त्यांचे अर्धवट राहिलेले आत्मचरित्र आता लेखक अशोक चोप्रा पूर्णत्वास नेत आहेत. त्यात अनेक राजकीय खुलासे व ९० च्या दशकातील राजकीय घडामोडींचा ऊहापोह करण्यात आला आहे.
सिंग यांनी या पुस्तकात शरद पवार यांनी वेळोवेळी काँग्रेसला कसा दगाफटका दिला याचे विवेचन केले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेले व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले सिंग हे १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांचे सहकारी मंत्री राहिले आहेत. मात्र, गांधी घराण्याशी जवळचे संबंध असलेल्या या नेत्याने शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जोरदार प्रहार केला होता. पवार यांच्या खोड्या हे काँग्रेस पक्षाशी सुसंगत नव्हत्या, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.
याबाबत ते विस्ताराने म्हणतात, १९८६ साली शरद पवारांना पक्षात परत घेताना मी राजीव गांधी यांना बजावले होते की, इतिहासाकडे पाहाल तर यातून काहीही चांगले साध्य होणार नाही. शरद पवार भविष्यात काँग्रेस पक्षाला नक्की डिवचतील आणि १९९८ साली पुन्हा तेच घडले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाला त्यांनी मलिन करण्याचा प्रयत्न केला व पुढे त्यांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
पवार एवढेच करुन थांबले नाहीत तर काँग्रेस विरोधात त्याचे षडयंत्र पुढेही चालू राहिले. महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसबरोबर घरोबा करीत सत्तेत वाटा मिळवला. यानंतरही ते वेळोवेळी कॉंग्रेसला दगाफटका देत राहतील, असे मला वाटते, असेही अर्जुनसिंग यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या सरकारसह डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातही (यूपीए-१) अर्जुनसिंग हे शरद पवारांचे सहकारी राहिलेले होते.
काँग्रेसला ‘सोनिया’ इंजिन हवे कशाला?, अर्जुनसिंगांचा गौप्यस्फोट
सोनिया पंतप्रधान झाल्या असत्या तर, पवारांनी मंत्रिपद स्वीकारले नसते
शरद पवार होणार निवृत्त!