आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेहला मसूद हत्या प्रकरणात तरुण विजय यांची चौकशी

12 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/नवी दिल्ली: माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ती शेहला मसूदच्या गेल्या महिन्यातील झालेल्या हत्याप्रकरणी भाजपा खासदार तरुण विजय यांची मध्य प्रदेश पोलिस चौकशी करणार आहे.
यासंदर्भात मध्य प्रदेश पोलिस पथक लवकरच दिल्लीला रवाना होईल, असे पोलिस अधिकाºयाने सांगितले. मसूदशी आपली चांगली मैत्री होती, त्यामुळे तपास अधिका-यांना काही माहिती हवी असल्यास ती देण्यास मी तयार आहे, असे विजय यांनी सांगितले. विजय यांच्याकडे भाजपाचे प्रवक्तेपदही आहे.
भोपाळमधील शोह-ए-फिजा भागातील घरासमोर कारमध्ये मसूदवर गोळीबार झाला होता. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आयोजित रॅलीला संबोधित करण्यापूर्वी मसूदवर हल्ला झाला होता.