आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर सेन्सॉर नाही : सचिन पायलट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुगल, फेसबुक आणि टिवटरवर सेन्सॉर लावण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मत दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भातील कायदे याआधीच बनवण्यात आले आहेत. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे रक्षण केले जाईल, असे पायलट म्हणाले.
दरम्यान, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साइट धोरणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी गुगल, फेसबूक आणि ट्विटर या साइटच्या येथील प्रमुखांशी बैठक घेतली. इंटरनेट, सोशल नेटर्किंग साइटच्या माध्यमातून सरकार कसे सशक्त करता येईल यावर चर्चा करण्यात आली. प्रशासनाचे दैनंदिन कामकाज समाजाच्या प्रतिनिधींसोबत मर्यादीत संवाद होतो. मात्र, सोशल मीडियामुळे लोकांच्या संपर्क, संवादाचे माध्यम विस्तारले आहे. याचा उपयोग नागरिक आणि प्रशासनामधील सेतूच्या रुपाने करता येऊ शकतो, असे सिब्बल म्हणाले. सोशल साइटचे माध्यम विशाल आहे. मात्र, त्याचा वापर करणारे मर्यादित आहेत. त्यामुळे सरकार अशा ठरावीक समूहाचे प्रतिनिधित्व करत आहे, असेही वाटता कामा नये. ज्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही त्यांच्यासाठी या मंचाचा कसा वापर करता येईल, अशी विचारणा या कंपन्यांकडे करण्यात आली, असे सिब्बल म्हणाले.
सोशल मीडियावर अवमानकारक व आक्षेपार्ह मजकुरावर निगराणी करण्याची व्यवस्था कधी अस्तित्वात येईल, असा प्रश्न विचारला असता सिब्बल यांनी उत्तर देण्याचे टाळले. सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह साहित्य टाकल्याबद्दल सिब्बल यांनी गेल्या आठवड्यात फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट आदी साइटच्या येथील प्रमुखांची चर्चा केली होती. आक्षेपार्ह साहित्य अपलोड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे सिब्बल यांनी बजावले होते. माध्यमे सहकार्य करणार नसतील तर योग्य ती पावले उचलली जातील, असे सिब्बल यांनी सुनावले होते.