आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia gandhi rejected demand to disclose details of it return

प्राप्तिकराची माहिती देण्यास सोनिया गांधींचा नकार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांचे उत्पन्न किती आहे आणि त्या प्राप्तिकर किती भरतात? असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
माहितीच्या अधिकाराखाली एका आरटीआयच्या कार्यकर्त्याने सोनिया गांधी यांच्या प्राप्तिकराची माहिती मागितली होती. मात्र, त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती देण्यास नकार दिला.
प्राप्तिकर विभागाला दिलेल्या पत्रात सोनिया गांधी लिहितात, ही अतिशय व्यक्तिगत माहीती आहे आणि ही माहीती सार्वजनिक करणे याच्याशी कोणत्याच सार्वजनिकहिताचा संबंध नाही.
आरटीआय कार्यकर्ता गोपालकृष्णन यांनी आर्थिक वर्ष २०००-२००१ ते २०१०-२०११ या दरम्यान सोनिया गांधी यांच्या प्राप्तिकर विवरण पत्राची माहिती मागितली होती.
सोनिया रडल्या हो, पण कोणासाठी?- बाटलाप्रकरणी बाळासाहेबांची काँग्रेसवर टीका
'बाटला हाऊस'ची छायाचित्रे पाहून रडल्या होत्या सोनिया- खुर्शीद
यूपीत कुणाशीही युती नाही : सोनिया