आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागाच्या भरात निवृत्तीचा निर्णय, आता निर्णयाचा पश्चाताप - सौरव गांगुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या घेतलेल्या निर्णयावर आता पश्चात्ताप होत आहे. रागाच्या भरात हा घेतलेला निर्णय फार चुकीचा ठरला, असे उद्गार भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काढले. अजून दोन वर्षे आपण सहजपणे खेळलो असतो, असेही तो या वेळी म्हणाला. उल्लेखनीय बाब अशी की, 2008 मध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत गांगुलीने गचाळ खेळीचे प्रदर्शन केले. त्यानंतर इराणी चषकासाठी जाहीर झालेल्या संघामध्ये त्याच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता.
‘संघामधून वगळल्याने प्रचंड राग आला होता. माझे पित्त चांगलेच खवळले होते. निवड समितीच्या या निर्णयामुळे मनात क्रोधाग्नी पेटला होता. याच संतापाच्या भरात मी तत्काळ निवृत्तीची घोषणा करण्याचा निर्णय घेतला,’ असेही गांगुलीने सांगितले.
त्या वेळी घेतलेल्या निर्णयाचा मला आजही पश्चात्ताप होतो. अजूनही दोन वर्षे मी चांगला खेळू शकलो असतो, असेही तो म्हणाला.