आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे मन आणि बुद्धी आजही ठणठणीत - सुरेश कलमाडी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले खासदार सुरेश कलमाडी यांनी आपण पूर्णपणे तंदुरुस्त असून, माझे मन आणि बुद्धी एकदम ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.

आज (गुरुवार) एम्स रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या कलमाडी पत्रकारांशी म्हणाले, माझ्याविषयी सध्या जे बोलले जात आहे ते चुकीचे आहे आणि एकदम ठीक आहे. एम्समध्ये मी नियमीत तपासणीसाठी आलो आहे. राष्ट्रकुलच्या आयोजनाबाबत तपास पथकाच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देत आहे.

कलमाडी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला तणाव, चिंता आणि मानसिक थकवा आल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांचे १९ जुलैला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एमआरआय करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी कलमाडींना स्मृतीभ्रंश झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा अहवाल तपासणीसाठी एम्सकडे पाठविण्यात आला होता. कलमाडी सध्या राष्ट्रकुल गैरव्यवहारप्रकरणी तिहार कारागृहात आहेत.