आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री शिंदे यांच्‍या वक्तव्‍यावरुन जया बच्‍चन भडकल्‍या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः नवे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचयावर पहिल्‍याच भाषणात दिलगिरी व्‍यक्त करण्‍याची वेळ आली. शिंदे यांच्‍या एका वक्तव्‍यावरुन खासदार जया बच्‍चन जाम भडकल्‍या. त्‍यांचा रुद्रावतार पाहुन शिंदे यांनी नमते घेत माफी मागितली.
राज्‍यसभेमध्‍ये हा प्रकार घडला. आसामच्‍या मुद्यावरुन सुशीलकुमार शिंदे निवेदन देत होते. शिंदे बोलत असतानाच जया बच्‍चन मध्‍येच बोलत होत्‍या. आधी माझे बोलणे होऊ द्या, थोडे थांबा, तुम्‍ही बहिणीसारख्‍या आहात, असे शिंदे वारंवार म्‍हणत होते. अखेर शिंदेही संतप्‍त झाले. हा अतिशय गंभीर विषय आहे. सिनेमाचा विषय नाही. तुम्‍ही बसा, अशा शब्‍दात शिंदे यांनी उत्तर दिले. त्‍यावरुन जया बच्‍चन भडकल्‍या. जया यांच्‍या पाठीशी विरोधी पक्षही उभे राहीले. गदारोळ वाढताच शिंदे यांनी नमते घेतले आणि म्‍हणाले, जया जी यांना वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. त्‍या माझ्या बहीणीसारख्‍या आहेत.'
काल लोकसभेमध्‍येही लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍या वक्तव्‍यावरुन सोनिया गांधी भडकल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍या रुद्रावतारापुढे अडवाणी यांनी नमते घेत विधान मागे घेतले होते.
युपीए-2 अवैधः अडवाणींच्‍या वक्तव्‍यावरुन सोनियांचा संताप