आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी अग्निवेश यांना न्यायालयाचा दिलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - अमरनाथ यात्रेबाबत विवादास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी स्वामी अग्निवेश यांना शपथपत्र सादर करण्यास पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे.
‘असे वक्तव्य केले होते अथवा नाही’ हे सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने अग्निवेश यांना 1 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती; परंतु अग्निवेश यांनी शपथपत्र सादर न करता त्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. आता या प्रकरणाची सुनावणी 12 जानेवारीला होणार आहे. हरियाणातील प्रवीणकुमार नावाच्या व्यक्तीन हासी पोलिस ठाण्यात 26 मे 2011 रोजी भादंवि कलम 295 व 295 ए नुसार स्वामी अग्निवेश यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल केली होती. हुर्र्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सैयद अली शाह गिलानी यांच्यासोबत या वर्षी 18 मे रोजी झालेल्या एका बैठकीत स्वामी अग्निवेश यांनी अमरनाथ यात्रा म्हणजे धर्माच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक असल्याचे वक्तव्य केल्याचे प्रवीणकुमारने या तक्रारीत म्हटले होते.