आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे फेकण्यामागे आरएसएसचा हात, दिग्विजय सिंग यांचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रामदेव बाबा यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे आणि काळे फेकणारा माणूस हा 'कॉंग्रेस विरोधी' असून त्याचे भाजपशी संबंध आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
लोकशाहीच्या तोंडावर काळे
दरम्यान, स्वामी रामदेव यांच्या तोंडावर काळी शाई फेकण्याच्या घटनेचा समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध केला. लोकशाहीच्या तोंडावर काळे फेकण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली. अशा कृत्यांमुळे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन थांबणार नाही तर उलट गती येईल, असेही ते म्हणाले.
दंगली घडविण्याचे षडयंत्र
अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीकडून एका भगव्या कपड्यातील व्यक्तीवर शाई फेकायला लावण्यामागे जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप स्वामी रामदेव यांनी केला आहे. काळे टाकण्याच्या घटनेमागे प्रथमदर्शनी तरी षडयंत्र असल्याचे दिसत आहे, असे सांगून स्वामी रामदेव म्हणाले की, 'माझे कार्यकर्तेही अल्पसंख्याक आहेत. या समाजाशी माझे काही शत्रुत्व नाही. अल्पसंख्याक समाजाला बटला हाउस प्रकरणावर आक्षेप असेल तर तो खुद्द गृहमंत्र्यांविषयीच असायला हवा. माझा आणि बटला हाउसचा काय संबंध ?
माझ्यावर शाई टाकणा-या माणसाला कसे माहित की मी बटला हाउस प्रकरणावर बोलेन, असा सवाल करून बाबा रामदेव म्हणाले की, तो तर शाई वगैरे घेऊन पूर्ण तयारीनिशी आला होता. त्यामुळेच या प्रकरणामागे षडयंत्र असावे असे वाटत आहे.
या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या घटनेचा तुमच्यावर काही परिणाम होईल का, या प्रश्नावर बाबा म्हणाले की, या घटनेचा आंदोलनावर काहीही परिणाम होणार नाही.
दिल्ली येथे काळ्या पैशाच्या मुद्द्यावर स्वामी रामदेव यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्यावर काळ्या रंगाची शाई फेकण्याची घटना घडली.
काळी शाई फेकणारा कोण ?
दिल्ली येथील पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांच्यावर काळी शाई फेकणा-या व्यक्तीचे नाव आहे कामरान सिद्दिकी. तो जामिया नगर येथे राहतो आणि 'रियल कॉज' या नावाची एक एनजीओ चालवतो.
त्याने याआधी जामिया नगर भागातून विधानसभा आणि महानगरपालिकेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. कामरान सिद्दीकी यानेच बटला हाउस एनकाउंटर प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगपुढे नेले होते.
रामदेव बाबा यांच्या तोंडावर काळं फेकलं
छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?
काळा पैसा परत न आणण्याच्या भूमिकेवर रामदेव बाबांची टीका