आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबा यांच्या तोंडावर काळं फेकलं

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली येथे काळ्या पैशाच्या मुद्द्यावर स्वामी रामदेव यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्यावर काळ्या रंगाची शाई फेकण्याची घटना घडली. पत्रकार परिषद संपल्यानंतर स्वामी रामदेव व्यासपीठ सोडत होते इतक्यात एका तरुणाने त्यांच्यावर काळे फेकले. काळे फेकण्यामागचे कारण समजू शकले नाही, मात्र काळे फेकणा-या व्यक्तीला उपस्थित लोकांनी चोप दिला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे.
काळे फेकणा-या व्यक्तीजवळ अॅसिडची एक बाटली आढळून आली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्वामी रामदेव यांनी त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. कॉन्स्‍टीट्यूशन क्‍लबमध्ये सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत शाई फेकणा सुरक्षा रक्षक बनून आला होता.
स्वामी रामदेव यांचे प्रवक्ते तिजारावाला यांनी म्हटले आले की, शाई फेकणा-या व्यक्तीकडे एक वायरलेस संच मिळाला. विशेष सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून तो पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. ही व्यक्ती अल्‍पसंख्‍यक समाजाची असल्याचे म्हटले जात आहे.
मी काळा पैसा मागितला, पण मला काळी शाई मिळाली, असे सांगून रामदेव बाबा म्हणाले की, 'ज्याचे जीवन देशासाठी समर्पित आहे, त्याच्यावर काळी शाई टाकल्याने काहीही फरक पडत नाही. चारित्र्य बिघडत नाही. यापुढेही आपण प्रामाणिकतेने आणि दृढतेने आपली लढाई सुरूच ठेऊ.' मी असे काय केले की ज्यामुळे माझ्याशी अशी वर्तणूक केली गेली असा सवालही त्यांनी केला.
स्वामी रामदेव यांनी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांचा दौरा करून काळ्या पैशाविषयी जनजागरण करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आपल्या अभियानाची सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा आदी राज्यांमध्ये जाऊन काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सभा घेणार आहे.' सभेसाठी परवानगी न मिळाल्यास देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून काळ्या पैशाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका विचारू, असा इशाराही योगगुरूंनी दिला.
काळी शाई फेकणारा कोण ?
दिल्ली येथील पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांच्यावर काळी शाई फेकणा-या व्यक्तीचे नाव आहे कामरान सिद्दिकी. तो जामिया नगर येथे राहतो आणि 'रियल कॉज' या नावाची एक एनजीओ चालवतो.
त्याने याआधी जामिया नगर भागातून विधानसभा आणि महानगरपालिकेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. कामरान सिद्दीकी यानेच बटला हाउस एनकाउंटर प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगपुढे नेले होते.
छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?
काळा पैसा परत न आणण्याच्या भूमिकेवर रामदेव बाबांची टीका
‘रामलिला’वरील कारवाईस रामदेव बाबाच जबाबदार
'ही वेळ कॉंग्रेसने उत्तर देण्याची नव्हे हिशोब देण्याची'