आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव प्रकरण : दिशाभूल केली असेल तर सुप्रीम कोर्ट उगारणार कारवाईचा बडगा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या वर्षी जूनमध्ये रामलीला मैदानावर मध्यरात्री झालेल्या लाठीमार प्रकरणी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला. प्रतिज्ञापत्रातून दिशाभूल करण्यात आली असेल तर त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वत: पुढाकार घेऊन पोलिस आणि केंद्र सरकारला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. न्या. बी. एस. चौहान आणि न्या. स्वतंत्र कुमार यांच्या पीठाने सोमवारी न्यायालयाला मदत करीत असलेले ज्येष्ठ वकील राजीव धवन यांचा अहवाल गांभीर्याने घेतला.
धवन यांचा दावा आहे की, ४ - ५ जून २०११ च्या मध्यरात्री रामलीला मैदानावर झालेली पोलिस कारवाई ही गृहमंत्रालयाने पूर्वनियोजित पद्धतीने केली होती आणि यामागे राजकीय लाभ मिळविण्याचा उद्देश होता. परंतु पोलिस आयुक्त बी. के. गुप्ता यांनी प्रतिज्ञापत्रातून दावा केला आहे की, पोलिसांनी आपल्या स्तरावर निर्णय घेऊन कारवाई केली. रामदेव बाबा यांनी लोकांना बेकायदा एकत्र केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
काळा पैसा परत न आणण्याच्या भूमिकेवर रामदेव बाबांची टीका
'रामलीला मैदानावरील कारवाईला रामदेव बाबाच जबाबदार!'
ही वेळ कॉंग्रेसने उत्तर देण्याची नव्हे हिशोब देण्याची