आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ तिकिटांच्या गैरप्रकाराची चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय दक्षता आयोग(सीव्हीसी) तत्काळ आरक्षण तिकिटांच्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत अथवा नाहीत यावर चौकशीचा भर राहणार आहे. सीव्हीसी रेल्वेच्या दक्षता आयोगाला चौकशी करण्याचे निर्देश देऊ शकते.
या संदर्भात सीव्हीसीचा अधिकारी म्हणाला की, तत्काळ योजनेत अनियमितता होत असल्याबद्दल आयोगाला कल्पना आहे. आम्हाला काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या प्रकरणांची चौकशी करण्याचा विचार आहे. असे असले तरी चौकशी समिती स्थापन करण्याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. चौकशीचे आदेश देण्यात आल्यास रेल्वे अधिकारी आणि दलालांमधील संबंधावर प्रकाश पडेल. दरम्यान, सीव्हीसी सचिव के.डी. त्रिपाठी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.