आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबांचा मंडप कोसळला, टीम अण्णाचा पुन्हा मीडियावर हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या सात दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची तब्येत बिघडली आहे. या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तब्येत बिघडली असली, तरीही आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे केजरीवाल आणि राय यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे केंद्र सरकार टीम अण्णासोबत चर्चा करण्याच्या विचारात दिसत नाही. आज उपोषणाचा सातवा दिवस संपत आला आहे तरीही सरकारकडून चर्चेची कोणतीही हालचाल दिसली नाही. सरकारने आगोदरच हे स्पष्ट केले आहे की, लोकपालवर संसदीय समितीचा अहवाल आल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही.
सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही, हे पाहून अण्णा हजारे यांनीही आक्रमक रूप धारण केले आहे. मंगळवारी अण्णांनी सांगितले की, "मिडीयामध्ये अशा बातम्या येत आहेत की, सरकार टीम अण्णासोबत चर्चा करीत नाहीये, परंतु अशा भ्रष्ट नेत्यांशी आम्हालाही बोलण्याची इच्छा नाही." जे सरकार वारंवार आम्हाला धोका देत आहे, त्यांचाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही.
अण्णांनी मीडियाची मागितली माफी
टीम अण्णाचे उपोषण सुरु असलेल्या जंतर-मंतर येथे पत्रकारांना वाईट वागणूक दिली जात आहे, त्याबद्दल अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अखेर माफी मागितली आहे.
अण्णांनी कार्यकर्त्यांना इशारा देताना म्हटले, आमचे आंदोलन अहिंसक मार्गाने सुरु आहे. यात कोणी हिंसा केली तर आंदोलन मागे घेण्यात येईल. तसेच मीडियाची माफी मागतांना अण्णा म्हणाले, मीडियासंदर्भात जर कोणी बरे-वाईट बोलले असेल, तर त्यांच्यावतीने मी माफी मागतो. आपले आंदोलन घराघरात पोहचवण्याचे काम मीडियानेच केले आहे. त्यांना कोणी काही बोलले असेल तर त्या बद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
केजरीवाल म्हणाले, आता वृत्तवाहिन्यांच्या मालकांनी विचार करण्याची गरज आहे की, ते कोणाच्या सोबत आहेत? पत्रकारांसोबत झालेल्या वाईट वागणुकीबद्दल आम्ही माफी मागतो.
टीम अण्णाचे सदस्य शांती भूषण यांनी सोमवारी रात्री म्हटले होते, मीडियाचे जे पत्रकार जंतर-मंतरवर आहेत त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. त्यांचा काहीही दोष नाही. मालकांच्याच हातात सगळे काही आहे. ते जाणिवपूर्वक आंदोलनाचे सत्य दाखवत नाहीत.
भूषण यांचे वक्तव्य आणि वाईट वागणुकीबद्दल संपादकांची संघटना ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (बीइए)त्यांचा निषेध केला आणि टीम अण्णांनी माफी मागावी, अशी मागणी संपादक संघटनेचे महासचिव एन.के.सिंह यांनी केली होती.
दरम्यान, योगगुरु रामदेव बाबा आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर आल्याने नाराज झालेल्या टीम अण्णाचा सूर थोडा मवाळ झाला आहे. टीम अण्णाचे सदस्य किरण बेदी आणि कुमार विश्वास म्हणाले, 'रामदेव बाबा कोणालाही भेटू शकतात. त्यांना त्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आमच्यासाठी एवढेच महत्त्वाचे आहे की, अण्णा हजारे आणि रामदेव बाबा ज्यासाठी लढत आहेत तो उद्देश एक आहे.' रविवारी रामदेव बाबा आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात एकत्र आले होते.
अण्णा-बाबांचे क्रांतिदिनी रणशिंग; 9 ऑगस्टला दिल्लीत आंदोलन
टीम अण्‍णाची राष्‍ट्रपतींवर टीका चुकीचीः रामदेव बाबा
बोगस कागदपत्रे प्रकरण रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण अटकेत
रामदेव बाबांच्या ताफ्यावर हल्ला, काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप
बाबा रामदेव लढविणार आगामी लोकसभा निवडणूक