आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम अण्णाचे उपोषण संपवू इच्छितात श्री श्री रविशंकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारवर दबाव टाकणा-या टीम अण्णाचे सध्या जंतरमंतरवर सुरु असलेले उपोषण श्री श्री रविशंकर संपवू इच्छितात. त्यांनी टीम अण्णांना आव्हान केले आहे की, आपण उपोषण सोडावे व आंदोलन सुरु ठेवावे. ज्यावर टीम अण्णाने काहीही निर्णय घेतला नाही. अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे उपोषणात पाच माणसे आली तरी शेवटच्या श्वसापर्यंत आम्ही लढू.
दरम्यान, शुक्रवारी लोकांची गर्दी नसल्याने हताश झालेली टीम अण्णात रामदेव बाबा यांनी जॉन फुंकली आहे. रामदेव बाबा जंतरमंतरवर हजर होताच हजारो लोक उपोषणस्थळी दाखल झाले.
मात्र रामदेव बाबा जातच पुन्हा मैदान मोकळे पडले. काल सकाळी ११ वाजता उपोषणस्थळी केवळ ३०० लोक उपस्थित होते. आजही तीच स्थिती आहे.
राष्ट्रपतींवर टीका चुकीची : रामदेवबाबा - टीम अण्णाच्या सदस्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर केलेली टीका योगगुरू रामदेवबाबांनी अयोग्य ठरवली आहे. जवळपास 2 हजार समर्थकांसह बाबा शुक्रवारी रामलीला मैदानातून मार्च करत टीम अण्णाचे उपोषण सुरू असलेल्या जंतरमंतरवर पोहोचले. टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया, गोपाल राय उपोषणाला बसले आहेत.
माध्यमांना कव्हरेज करण्यासही रोखले- उपोषणस्थळी लोकांची संख्या सातत्याने घटत आहे. शुक्रवारी अण्णा बोलण्यासाठी उभे ठाकले तेव्हा तेथे जवळपास 300 लोक होते. माध्यमांना कव्हरेज करण्यासही रोखण्यात आले. याउपर माध्यमांनी जंतर-मंतर मैदानावर व्यासपीठासमोर आंदोलकांविना रिकामी पडलेली जागा दिवसभर दाखवली. आयोजकांनी मात्र यामागे बाहेरच्या शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. सशक्त लोकपालखेरीज प्रणवसह केंद्रीय मंत्र्यांवरील आरोपांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची टीम अण्णाची मागणी आहे. यूपीए सरकारने मीडियाला आंदोलन अंडरप्ले करण्यास सांगितले आहे, असा आरोप किरण बेदी यांनी केला आहे. यासाठी सरकारने स्पष्ट पत्रच पाठवले आहे, असे बेदी म्हणाल्या.
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे