आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: रामदेव बाबा आणि अण्‍णा हजारेंचे भ्रष्‍टाचार-काळ्यापैशाविरोधातील उपोषण सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- योगगुरू रामदेव बाबा आणि ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते अण्‍णा हजारे काळ्या पैशाविरोधात आणि भ्रष्‍टाचारविरोधात राजधानी दिल्‍लीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत.
दिल्‍लीच्‍या जंतर मंतरवर आयोजित हे उपोषण रामदेव बाबांच्‍या गेल्‍यावर्षीच्‍या रामलीला मैदानावर झालेल्‍या उपोषणास एक वर्ष झाल्‍यानिमित्‍त करण्‍यात आले आहे. रामदेव बाबांना गेल्‍यावर्षी तीन आणि चार जूनच्‍या दरम्‍यान अर्ध्‍या रात्रीत रामलीला मैदानावरून अटक करण्‍यात आली होती.
उपोषणस्‍थळी पोलिसांनी मोठयाप्रमाणात बंदोबस्‍त तैनात केला आहे. रामदेव बाबांनी समर्थकांच्‍या सोयीसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय तसेच मोठया स्‍क्रीनची व्‍यवस्‍था केली आहे. उपोषणस्‍थळी सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्‍यात आली आहे.
फोटोंमध्‍ये पाहा उपोषणस्‍थळी रामदेव बाबा आणि अण्‍णा हजारे यांच्‍या समर्थकांना...