आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणाचा 9 वा दिवस : अण्णा समर्थकांनी भीतीच्या पोटी रात्र जागून काढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम अण्णाने राजकारणात उतरावे? हा प्रश्न खुद्द टीम अण्णानेच जनतेला विचारला आहे. जंतर मंतरच्या स्टेजवर प्रशांत भूषणने घोषणा केली, खरंच टीम अण्णाने राजकारणात उतरावे की नाही याबाबत जनतेने दोन दिवसात आपली मते द्यावीत. उपोषणस्थळीच लोकांनी हात वर करुन आपले म्हणणे सगळ्यासमवेत मांडावे.
याआधी अनुपम खेर यांनी टीम अण्णाला सल्ला देताना म्हटले होते की, टीम अण्णाने आता रस्त्यावर नव्हे तर संसदेत आवाज उठविला पाहिजे. कारण सरकार मुखे आणि बहिरे झाले आहे. त्यांना हा आवाज जाणार नाही. २३ वरिष्ठ नागरिकांनीही टाम अण्णांना उपोषण सोडण्याचे आवाहन करतानाच राजकीय पर्याय बनण्याचे आवाहन केले होते.

चित्रपट अभिनेता अनुपम खेर यांनी टीम अण्णा यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी जंतर-मंतरवर पोहचलेल्या अनुपम यांनी सांगितले की, 'मी येथे टीम अण्णांना आवाहन करीत आहे की, गेल्या ९ दिवसापासून सुरु असलेले उपोषण त्यांनी सोडून द्यावे. आम्हाला वाटत आहे की, अरविंद केजरीवाल ठीकठाक राहावेत जेणेकरुन भ्रष्‍टाचाराच्या लढाईत ते आमचे नेतृत्‍व करु शकतील. देशातील भ्रष्‍टाचार संपणे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणे प्रत्येक देशवाशियांचे कर्तव्य आहे.

टीम अण्णाच्या उपोषणाचा आज ९ वा दिवस आहे. मात्र काल पोलिसांनी इशारा दिल्याने भीतीच्या पोटी अण्णा समर्थकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. बुधवारी रात्री पुण्यात साखळी स्फोट झाल्यानंतर जंतर-मंतरवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत मजबूत लोकपाल विधेयक आणले जात नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील. आता सरकारबरोबर चर्चा नाही, जरी पंतप्रधानांनी चर्चेसाठी बोलावले तरी, आम्ही चर्चा करणार नसल्याचे अण्णांनी स्पष्ट केले.
उपोषणाला बसलेल्या लोकांची प्रकृती बिघडत चालल्याने सरकारने यात न पडण्याचे धोरण स्वीकारले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने पोलिसांना तुम्ही आपले काम करा, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणूका चौधरी यांनी केजरीवालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, केजरीवाल लोकांना भडकावत आहेत.
भ्रष्ट मंत्र्याना जेलमध्ये घातल्यावरच उपोषण सोडू- अरविंद केजरीवाल
अण्णा समर्थकांची पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर पाठिंबा- अण्णा