आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team Anna Should Not Criticise President Says Baba Ramdev

टीम अण्‍णाची राष्‍ट्रपतींवर टीका चुकीचीः रामदेव बाबांची विरुद्ध भूमिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः टीम अण्‍णा आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्‍यातील मतभेद पुन्‍हा चव्‍हाट्यावर आले आहेत. राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जींवर टीम अण्‍णाने टीका करु नये, असे मत रामदेव बाबा यांनी व्‍यक्त केले. ते रामलीला मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तिथुन ते जंतर मंतर येथे टीम अण्‍णाच्‍या उपोषणस्‍थळी पोहोचले.
रामलीला मैदानावर रामदेव बाबा यांनी भाषणातून लोकपाल विधेयक मंजूर करणे आणि काळा पैसा देशात परत आणणे, या प्रमुख मागण्‍यांचा पुनरुच्‍चार केला. परंतु, टीम अण्‍णाने प्रणव मुखर्जींवर केलेल्‍या टीकेवर त्‍यांनी नाराजी व्‍यक्त केली. ते म्‍हणाले, राष्‍ट्रपती हे घटनात्‍मक पद आहे. घटनेतील ते सर्वोच्‍च पद आहे. या पदावर असलेल्‍या व्‍यक्तीवर आरोप करणे चुकीचे आहे. जे काही आहे, ते पाच वर्षांनी बघुन घेऊ. स्‍वतः अण्‍णा हजारे यांनाही हे मान्‍य आहे, असे रामदेव बाबा म्‍हणाले.
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे
टीम अण्‍णाच्‍या उपोषणस्‍थळी महिला पत्रकारांसोबत असभ्‍य वर्तन
PHOTOS : टीम अण्णाच्या उपोषणाला जनतेने नाकारले