आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा ‘ब्रँड’बाजा; बाजार उठला!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया दौ-यावर कांगारूंनी बँडबाजा वाजवल्यानंतर टीम इंडियाच्या रथीमहारथींच्या ब्रँड व्हॅल्यूचाही ढोल फुटला आहे. पळत्याच्या मागे धावणा-या जाहिरात विश्वाने ऑस्ट्रेलियात खेळपट्टीवरून पळ काढणा-या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूत 20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर ब्रँड एक्स्पर्ट्स, मीडिया विश्लेषक आणि स्पोर्ट्स मार्केटिंग संस्थांकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे खेळाडूंना जाहिरातींतून मिळणा-या पैशांत आता 20 टक्क्यांची कपात केली जाणार आहे. यातच मार्च महिन्यात बहुतेक खेळाडूंच्या करारांचे नूतनीकरण होणार आहे. मात्र ढिसाळ कामगिरीमुळे काहींचा करार गुंडाळला, तर काहींची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
ब्रँड सल्लागार संतोष सूद यांच्या मते कसोटीतून लवकर निवृत्त होण्याच्या संकेतांमुळे धोनीची किंमत नव्याने ठरवली जाऊ शकते. फ्यूचर ब्रँड्सचे सीईओ संतोष देसाई म्हणतात, पराभवामुळे धोनी आणि इतर खेळाडूंशी जुळलेल्या ब्रँड्सना चांगलाच झटका बसेल. निवृत्तीनंतरही जाहिरातींत झळकून पैसा कमावणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमची पत आजही टिकून आहे, हे विशेष. तोशिबा कंपनीचे प्रचार-व्यवस्थापन करणा-या झेनिथ ऑप्टोमीडियाचे उपाध्यक्ष नवीन खेमका म्हणाले, कंपन्यांनी करारांबाबत नव्याने विचार करणे सुरू केले आहे. द्रविड, लक्ष्मण, विराट कोहली, झहीर खान, गौतम गंभीर, आदी खेळाडूंचे असेच अवमूल्यन होण्याची शक्यता आहे.
क्वॉन या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी एमडी अनिरबनदास ब्लाह सांगतात, खराब कामगिरीमुळे क्रिकेटर्सवर पैसा लावण्यात कंपन्या कचरत आहेत.

अरेरे... पत गेली, पाठोपाठ किंमतही घटली !
210 कोटी
भारतीय कर्णधारासोबत रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीने तीन वर्षांसाठी 210 कोटी रुपयांचा करार केला आहे.
डील : 23 कंपन्यांत सोनी ब्राव्हिया, पेप्सिको, रिबॉक, एअरसेल, गोदरेज, बिग बाजार, आम्रपाली बिल्डर्स, मॅक्स, हेर्शे. झंडू-इमामीसोबत 4 कोटींचा करार, मॅकडॉवेल सोडा : 26 कोटी

05 कोटी लिटल मास्टर प्रत्येक कंपनीकडून 5 कोटी रुपये आकारतो. त्याच्या खात्यात 20 पेक्षा अधिक कंपन्या आहेत.
डील : ल्युमिनस इर्न्व्हर्टर्स, बूस्ट, अदिदास, आयटीसी, ऑडेमार्स पिगॉट, कॅनॉन, अविवा लाइफ इन्शुरन्स, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, तोशिबा, जेपी सिमेंट्स, उजाला टेक्नोब्राइट, कॅस्ट्रॉल इंडिया, कोकाकोला आदी.

2.5 कोटी डील : हा धडाकेबाज फलंदाज अदिदास, कार्बन मोबाइल, रॉयल चॅलेंज, हिरो मोटोकॉर्प, झंडूबाम आदी उत्पादनांच्या जाहिरातीत झळकतो.