आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Abu Hamja At Training At Karachi Plane Attack For 9 11 As India

9/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होता अबू हमजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील आरोपी आणि लष्‍कर-ए-तैयबाचा दहशतवादी‍सैयद जबीउद्दीन उर्फ अबू हमजा भारतात अमेरिकेतील 9/11 सारख्या हल्ल्याची तयारी करत होता, असा त्याने स्वत: दिल्ली पोलिसांना कबुली जबाब दिला.
अबू हमजाने या मिशनसाठी विमान चालविण्याचेही प्रशिक्षण घेतले होते. लष्कर-ए-तैयबाने हमजाच्या दोन साथीदारांनाही विमान उडविण्‍याचे प्रशिक्षण दिले होते. त्यात महाराष्‍ट्रातील बीड येथी फैयाज काजी आणि ठाण्यातील मोहम्मद राहिल शेख यांचा समावेश आहे.
या तिघांना कराचीमध्ये नेव्ही आणि एव्हिएशनचे प्रशिक्षण देण्यात आले होते. 2006 मध्ये औरंगाबादमध्ये शस्त्रसाठा उतरविल्यानंतर हे तिघे पाकिस्तानात रवाना झाले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण सुरू केले होते. हमजासह त्याच्या दोन साथीदारांना कराची येथील मालिर कॅट भागात प्रशिक्षण घेतले होते.

चोराच्या उलट्या बोंबा: अबू हमजा आणि पाकिस्‍तानचा काही संबंध नाही- मलिक
नरेंद्र मोदी होते अबू जुंदलच्‍या निशाण्‍यावर
जबीउद्दीनचा झाला अबू जिंदाल
अबू जिंदालचे कुटुंबिय बीडमधुन बेपत्ता, घराला कुलुप ठोकून पसार