आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Abu Jundal Wanted To Kill Narendra Modi

नरेंद्र मोदी होते अबू जुंदलच्‍या निशाण्‍यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः मुंबईवरील 26/11च्या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी सय्यद जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू हमजा ऊर्फ अबू जुंदलच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मूळचा बीड येथील असलेल्या जबीउद्दीनला दिल्ली पोलिसांनी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. न्यायालयाने 5 जुलैपर्यंत त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्‍यान, त्‍याचे कुटुंबिय बेपत्ता असून गेवराई येथील निवासस्‍थानी कुलुप आहे. पोलिसांची त्‍याच्‍या घरावर पाळत आहे. घराला कुलुप ठोकून त्‍याचे नातेवाईक पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले. अबू जुंदलचा ताबा घेण्‍यासाठी मुंबई पोलिसांनी न्‍यायालयात अर्ज दाखल केला आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक त्‍यासाठी नवी दिल्‍लीलाही जाणार आहे.
अबू जुंदल भारतात कशासाठी परतला, हे एक मोठे कोडे आहे. मुंबई हल्‍ल्‍यानंतर आणखी एका मोठ्या हल्‍ल्‍याची तयारी असावी, असा अंदाज आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी त्‍याच्‍या निशाण्‍यावर होते. दिल्‍ली पोलिसांनी त्‍याला काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. परंतु, डीएनए चाचणीनंतर त्‍याची ओळख पटल्‍यानंतरच अटकेची माहिती देण्‍यात आली. गोध्रा दंगलीनंतर तो अतिशय व्‍यथित झाला होता. त्‍यामुळेच त्‍याने मोदी यांच्‍या हत्‍येचा कट रचला होता.
पोलिस 2006 पासून जबीच्या शोधात होते. इंटरपोलनेही त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. तो भारतात येत असल्याचा सुगावा दिल्ली पोलिसांना लागला. विमानातून उतरताच गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाकिस्तानी पासपोर्ट व काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पोलिसांनी त्याला हजर केले. जबी सौदीत रियासत अली नावाने राहत होता.
मुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल!
PHOTOS: भारताला हवे आहेत हे टॉप फाईव्ह मोस्ट वॉन्टेड दहशतवादी!
आरोपी जबीउद्दीनला बीडमध्‍येच मिळाले दहशतवादाचे बाळकडू