आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- मोबाईल वापरणा-या ग्राहकांना आता आपल्या मोबाईलवरून १०० एसएमएस ऐवजी २०० एसएमएस पाठवता येतील. काही दिवसांपूर्वीच ट्रायने (टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया) एका सीम कार्डवरून दिवसाला १०० एसएमएस पाठवण्याची मर्यादा ठेवली होती. त्यामध्ये बदल करून त्यांनी २०० एसएमएस पाठवण्याची परवानगी दिली आहे. ग्राहकांकडून वांरवार होणा-या मागणीमुळे एसएमएसची मर्यादा १०० वरून २०० पर्यंत वाढवली आहे, असे ट्रायने म्हटले आहे. आजपासूनच याची अमंलबजावणी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.