आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'गुप्त बैठकीत' नितीशकुमारांनी घेतले आश्वासन, मोदी नसतील पंतप्रधानपदाचे उमेदवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील वाद अजूनही मिटलेले दिसत नाही. नितीशकुमारांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून, आगामी लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील असे आश्वासन घेतले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानूसार नितीशकुमार यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडून आश्वासन घेतले आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांना पुढे आणले जाणार नाही. अशीही माहिती आहे की, गडकरींनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड एनडीएच्या सहकारी पक्षांशी चर्चा करुनच केली जाईल असे म्हटले आहे. गडकरी आणि नितीशकुमारांची ही 'गुप्त बैठक' २५ जुलैला नवी दिल्लीत झाली होती.
काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत नितीशकुमार यांनी एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार धर्मनिरपेक्ष प्रतिमेचा असावा असे म्हटले होते. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते.
अडवाणींची ब्लॉगवाणी : २०१४ मध्ये काँग्रेस - भाजपचा पंतप्रधान होणे अशक्य
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे दावेदार - लालकृष्ण अडवाणी