आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uma Bharati Commented On Soniya And Rahul Gandhi

उमा भारती-राहुल वाक्युद्ध, बाहेरच्या उमेदवारांमुळे काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये बाहेरच्या उमेदवाराच्या मुद्द्यावर कॉँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. कॉँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. उमा भारती यांना मध्य प्रदेशातून बाहेर काढल्यामुळे त्या उत्तर प्रदेशमध्ये आल्या आहेत, असे राहुल यांनी म्हटले आहे. याच्या उत्तरादाखल उमा भारती म्हणाल्या की, राहुल यांनी पहिल्यांदा आपल्या आईची पार्श्वभूमी पाहावी आणि त्यानंतर आत्याबाबत प्रश्न उपस्थित करावा.
बुंदेलखंड विभागाच्या दौ-यावर असलेले राहुल गांधी यांनी गुरुवारी महोबा जिल्ह्याच्या कुलपहाडमध्ये सभा घेतली. राहुल म्हणाले की, बुंदेलखंड कर्जाच्या खाईत लोटला जात होता. येथील शेतकरी आत्महत्या करत होते त्या वेळी उमा भारती कुठे होत्या? येथील जनतेची रडवेली अवस्था झाली होती तेव्हा उमा भारती येथे का आल्या नाहीत, असा सवाला राहुल यांनी केला. भाजपप्रमाणे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे नेतेही इकडे फिरकले नाहीत. लोकांच्या वेदना जाणून घेत केंद्र सरकारने बुंदेलखंडसाठी विशेष पॅकेज देण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पॅकेज जाहीर करण्यात आले आणि आता निवडणुका समोर येताच सर्व जण इकडे येत आहेत, असे राहुल म्हणाले. राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर देत उमा भारती म्हणाल्या की, कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी इटलीहून भारतात येऊ शकतात तर मी मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशात का नाही येऊ शकत नाही? माजी पंतप्रधान राजीव गांधी मला बहीण मानत होते. त्यामुळे राहुल गांधींनी मला सहज घेऊ नये. त्यांनी पहिल्यांदा आईची पार्श्वभूमी पाहावी आणि नंतर आत्याबाबत वक्तव्य करावे. त्यांनी कॉँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंह यांच्यावरही टिप्पणी केली. राहुल गांधी यांचे गुरू दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशामध्ये मी धूळ चारली आहे. आता गुरू आणि शिष्य उत्तर प्रदेश निवडणूक मोहिमेवर आहेत. दिग्विजय सिंह यांची मध्य प्रदेशात जशी अवस्था केली तशीच ती उत्तर प्रदेशातही करू, असे उमा भारती म्हणाल्या.
काँग्रेसचे समीकरण बिघडले
भाजपकडून चरखारी मतदारसंघातून उमा भारती यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर कॉँग्रेसची या मतदारसंघातील समीकरणे बिघडली आहेत. राहुल गांधी यांनी प्राधान्य दिलेल्या या भागात कॉँग्रेस चांगले प्रदर्शन करेल, अशी आशा करण्यात येत होती. मात्र, उमा यांच्या माध्यमातून लोध आणि अन्य मागास वर्गाच्या मतदारांत फूट पाडण्याची योजना भाजपने तयार केली आहे.