आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे पुन्हा ओबीसी कार्ड, उमा भारती युपीच्या विधानसभा आखाड्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एनआरएचएम घोटाळ्यात अडकलेले माजी मंत्री बाबूसिंह कुशवाह यांना पक्षात प्रवेश दिल्याने पक्षात बंडाची भाषा करणारया भाजपच्या नेत्या उमा भारती या आपले नशिब अजमावणार आहेत. उमा भारती यांना बुंदेलखंड किंवा महोबा जिल्ह्यातील चरखारी येथून उमेदवारी देण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घरी बुधवारी रात्री उशीरा उत्तरप्रदेश व दिल्लीतील काही नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला.
मात्र, गडकरी यांनी एक दिवस आधीच उमा भारती युपीच्या विधानसभेतील आखाड्यात निवडणुक लढवतील, असा संकेत दिला होता. त्यांनी म्हटले होते उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या निवडणुक प्रभारी उमा भारती निवडणुक लढवू शकतात तसेच इतर नेत्यांसारख्याच त्याही मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत.
मायावती यांच्या सरकारमधील भ्रष्ट नेते कुशवाहा यांना भाजपने पक्षात घेतल्याने उमा भारती यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युपीच्या निवडणुक प्रचारातील स्टार प्रचारक असणारया उमा भारती यांना कुशवाहा यांनी पक्षात घेतल्यानंतर आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत जिंकल्यास मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून राजनाथ सिंह, कलराज मिश्र, प्रदेशाध्यक्ष सूर्यप्रताप शाही आणि उमा भारती यांचे नावे पुढे येत आहेत. मात्र राजनाथ सिंह यांनी आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे पक्षाने निवडणुक जिंकल्यास राजनाथ सिंह मुख्यमंत्री बनणार नाहीत.
मायावतींना निवडणूक आयोगाचा दणका- आपल्या व पक्षचिन्ह हत्तीच्या मूर्त्या झाकण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगावर टीका करणार्‍या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी चांगलेच खडसावले आहे.
मायावती या वरिष्ठ नेत्या आहेत, कोणतीही टिप्पणी करण्याआधी त्यांनी विचार करूनच बोलावे, असा सल्ला कुरेशी यांनी दिला. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात मायावती व त्यांचा पक्ष बसपाचे चिन्ह हत्तीच्या मूर्ती झाकण्याचा आदेश दिला आहे. या मुद्दय़ावर मायावतींनी चांगलीच आगपाखड केली होती. आता निवडणूक आयोगाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मायावतींनी बेताल टिप्पण्या करू नयेत. यामुळे दुसरे पक्षही सरकारी उद्यानांत आपली निवडणूक चिन्हे उभारण्याची मागणी करू शकतात. या पक्षांना आयोग काय उत्तर देईल, असा रोकडा सवालही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर सर्व पक्षांसाठी सारखे मैदान देणे, हे आयोगाचे काम आहे. आम्ही सर्वच मोठय़ा नेत्यांच्या प्रतिमा झाकण्याचे आदेश देतो. यात मायावतींना सूट कशी देता येईल, असेही कुरेशी म्हणाले.
कुशवाह प्रकरणावरून उमा भारतींचे बंड, मनेकानेही दिला पाठींबा