आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unable To Get 26 11 Handler Jundal's Custody, Nia Tells Court

26/11 : पाकिस्तानी ISIच्या मेजरने पुरविली होती कसाबला एके-47 ची काडतुसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेला २६/११चा कथित मास्टरमाइंड अबु जिंदाल याने चौकशीदरम्यान सांगितले की, पाकिस्तानी सरकारी गुप्तचर संघटना आयएसआयचा मेजर समीर अली याने मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांना एके ४७ची काडतुसे उपलब्ध करुन दिली होती. काडतुसाने भरलेल्या दोन पेट्या दहशथवाद्यांना मुजफ्फराबाद येथे दिल्या होत्या.
चौकशीदरम्यान, जिंदालने आयएसआयचा मेजर समीर अली आणि कर्नल हमजा यांची नावे घेतली आहेत. जिंदाल यांच्या म्हणण्यानुसार, आयएसआयचे अधिकारी मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांशी थेट संपर्कात होते. मेजर समीर अली २६/११च्या वेळी लष्कर-ए-तोयबाच्या कंट्रोल रुममध्ये उपस्थित होता. तर कर्नल हमजा याने हल्ल्यानंतर जिंदाल याला पाकिस्तानमधून एप्रिल-मे २०११मध्ये सौदी अरबला जाण्यास मदत केली होती.
गुरुवारी दिल्ली न्यायालयाने जिंदाल याला १५ दिवसासाठी दिल्ली पोलिसांच्या कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. जिंदाल आता दोन आठवडे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असेल. या दरम्यान पोलिस त्याची विशेष चौकशी करतील. तसेच यावेळी त्याने साजिद मीर यांची ओळख सांगितली. जिंदालच्या सांगण्यावरुन साजिद हा लष्कर आणि आयएसआय यांच्यातील प्रमुख मोरक्या व दुवा होता. मुंबई हल्ल्याची रुपरेषाही त्याने तयार केली होती.
साजिद मीरनेच पाकिस्तानमधील मुजफ्फराबाद येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. तेथेच आयएसआयचा मेजर समीर अली याने दहशतवाद्यांना एक ४७ची काडतुसे पुरवली होती. जिंदालने चौकशी दरम्यान सांगितले की, मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या चौकशी व तपास करणा-या संस्थेने कराचीतील कंट्रोल रुमवर हल्ला करुन ती नष्ट केली होती.
'अटकेतील माझा मुलगा नाही, जबीउद्दीन दहशतवादी असू शकत नाही\'
मुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल!
जबीउद्दीनचा झाला अबू जिंदाल