आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई स्फोटाचे कनेक्शन जम्मू काश्मिर पोलिसांपर्यंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू काश्मिर पोलिसांनी नुकतेच एका खूनाच्या आरोपात त्यांच्याच तीन पोलिसांना जेरबंद केले आहे. त्यातील एक पोलिस जम्मू कश्मिर पोलिस दलाचा हेर म्हणून काम करत होता. मात्र, आता अशी माहिती समोर आली आहे की, त्याने पोलिसांना 'डबल क्रॉस' करत, दहशतवाद्यांना गुप्त माहिती देत, दहशतवादी कृत्यात त्यांना मदत केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार जम्मु कश्मिर पोलिसात कॉन्स्टेबल असलेला मुख्तार अहमद शेख पोलिसांचा हेर होता. पोलिसांसाठी हेरगिरी करताना त्याचे दहशतवादी संघटना लष्करशी सुत जूळले. शेखच्याच सहाय्याने दहशतवाद्यांनी मोबाईल सिम कार्ड मिळवले, ज्यांचा वापर २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई स्फोटासाठी करण्यात आला.
पोलिसांना संशय आहे की, शेखने पोलिसांसाठी हेरगिरी करण्याएवजी दहशतवाद्यांना त्यांच्या काळ्या कृत्यात मदत केली. त्याला नुकतेच दहशतावदी संघटना हिजबूल मुजाहिदीनच्या एका स्वयंभू माजी कंमाडची श्रीनगरमध्ये हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
मुंबई स्फोटानंतर दहशतवाद्यांना सिम कार्ड पुरवल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी शेखला डिसेंबर २००८ मध्ये अटक देखील केली होती. त्याने २२ सिम कार्ड पुरवले होते त्यातील काहींचा वापर दहशतवाद्यांनी केला होता. त्यावेळी जम्मू काश्मिर पोलिसांच्या शिफारशीमुळे शेखला सोडून देण्यात आले आणि तो पुन्हा कामावर रुजू झाला. शेखला अटक झाल्यास पोलिसांचे अंडरकव्हर ऑपरेशन संकटात सापडेल, असा युक्तीवाद पोलिसांनी तेव्हा केला होता. त्यामुळे त्याला पुन्हा इंटेलिजन्स विंगमध्ये पाठवण्यात आले.
मात्र, जेव्हा श्रीनगर हत्येचा तपास सूरु झाला तेव्हा, पोलिसांना अनेक खळबळजनक घटनांची माहिती मिळत गेली. श्रीनगर हत्येप्रकरणी तीन पोलिसांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या तपासादरम्यानच शेखचा खरा चेहरा पोलिस अधिका-यांसमोर आला.
पोलिसांना डबल क्रॉस करणा-या या प्रकारणात आणखी कोणाकोणाचे संबंध आहेत याचा आता कसून शोध घेतला जात आहे.
अतिरेकी भटकळशी नकीचा ‘फेसबुक’वरून संपर्क: मुंबई एटीएसचा दावा