आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Asked Agencies To Keep Eye On Social Networking Websites And Moblie Sms For Assam Issue

आसाम हिसांचार: अफवा पसरवणार्‍यांना अटक करा- गृहमंत्रालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अफवेचे वावटळ पसरल्याने देशातील इतर भागात राहणार्‍या आसामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा अफवा पसरवणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.
सोशल नेटवर्कींग वेबसाइट आणि मोबाइल एसएमएसच्या माध्यमातून देशातील आसामी नागरिकांना हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच जनतेच्या भावना भडकवण्याचेही काम काही समाजकंटक करत आहेत. जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. याशिवाय जनतेत अफवा पसरवणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचेही आदेश शिंदेंनी दिले आहे.
जनतेमध्ये अफवा पसरणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्‍याची जबाबदारी केंद्रीय चौकशी संस्थेवर सोपवण्यात आली आहे. या कामात विविध राज्यातील चौकशी संस्थाचे सहकार्य घेण्‍याचे सांगण्यात आले आहे.
देशात पसरत असणार्‍या अफवांमुळेच बंगळुरुसह महाराष्‍ट्रातील हजारो आसामी नागरिक मिळेल त्या रेल्वेने मायदेशी परतत आहेत.
सोशल मीडिया आणि मोबाइल एसएमएसच्या माध्यमातून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा संशंय गृहमंत्रालयाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया आणि मोबाइल एसएमएसवरही गृहमंत्रालयाची करडी नजर राहणार आहे.
दरम्यान, देशात अफवा पसरल्याने देशातील अन्य भागातील आसाममधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महाराष्‍ट्रातील मुंबई, नाशिकमधीलही आसामी नागरिकांनी मायदेशी परतण्यास सुरुवात केली आहे.
धगधगते आसाम : विस्थापित भयभीतच
आसाम हिंसाचाराला धार्मिक रंग देणे दुर्दैवी- विहिंप
थेट आसामहून : ना घुसखोर जाणार, ना होणार आसाम शांत