आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशवाह यांना तिकिट देण्यावरुन अडवाणी संतप्त? पक्षात दुफळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/लखनौ - एनआरएचएम घोटाळ्यातील आरोपी आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री बाबुसिंह कुशवाह यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्यामुळे पक्षाच्या संकटात भरच पडली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी देखील कुशवाह यांना पक्षात प्रवेश देण्याच्या बाजूने नव्हते, फक्त भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या शब्दाखातर त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुशवाह यांच्या प्रवेशावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. अशी माहिती आहे की, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सूर्यप्रताप शाही आणि विनय कटियार हे कुशवाह यांच्या बाजूने तर त्यांच्या पक्ष प्रवेशाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, मुख्तार अब्बास नक्वी आणि एस. एस. अहलुवालिया हे आहेत.
कुशवाह आणि त्यांचे सहकारी यांच्या घरांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले आहेत. यामुळे विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर बाबूसिंह कुशवाह यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी दबाव वाढत असल्याची माहिती आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज (बुधवारी) महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीत उत्तर प्रदेशातील १०० उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहे. भाजप नेते विजय बहादूर पाठक म्हणाले, पक्ष कोणत्याही भ्रष्ट व्यक्तिचे समर्थन करणार नाही. तपास यंत्रणेला त्यांची कारवाई करु दिली पाहिजे. मात्र कुशवाह बसपमध्ये होते तेव्हा सीबीआयने त्यांच्याविरोधात कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उत्तर प्रदेश भाजप नेता आय. पी. सिंह म्हणाले, कुशवाह यांना भाजपमध्ये प्रवेश देणे ही मोठी चूक होती.
पक्षाचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी देखील कुशवाह यांना प्रवेश देण्यास नापसंती व्यक्त केली होती. मात्र आता कुशवाह यांच्यासह भ्रष्टाचाराचा आरोप असलेले बादशाह सिंह यांनाही भाजपमधून काढून टाकण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात घोडेबाजार तेजीत
उत्तर प्रदेशात तरुण नेतृत्वाची अग्निपरीक्षा