आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Up Court Awards Capital Punishment In Female Infanticide Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍त्री भ्रूणहत्‍याः उत्तर प्रदेशच्‍या न्‍यायालयाकडून एकाला फाशीची शिक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाथरस (युपी)- स्‍त्री भ्रूणहत्‍येविरोधात समाजाला सावध करणारा अतिशय कठोर निर्णय उत्तर प्रदेशच्‍या न्‍यायालयाने दिला आहे. स्‍त्री भ्रूण हत्‍या करणा-या एका व्‍यक्तीला सत्र न्‍यायालयाने मृत्‍यूदंड ठोठावला आहे. मुकेश असे या व्‍यक्तीचे नाव असून त्‍याने 21 जानेवारी रोजी त्‍याच्‍या 3 दिवसांच्‍या मुलीची गळा आवळून हत्‍या केली होती. ही घटना घडली त्‍यावेळी त्‍याची पत्‍नी मंजू ही दुस-या खोलीत होती. याच संधीचा त्‍याने फायदा घेतला. मुकेशला दोन मुली आहेत. त्‍याला मुलगा हवा होता. परंतु, तिसरेही अपत्‍य मुलगीच निघाल्‍याने तो नाराज होता. त्‍यातून त्‍याने स्‍त्री भ्रूणहत्‍येसारखा गंभीर गुन्‍हा केला, असे सरकारी पक्षाने सांगितले.
समाजामध्‍ये स्‍त्री भ्रूणहत्‍येचे प्रमाण वाढतच आहे. जनजागृती तसेच कारवाया करुनही हे प्रकार थांबत नाहीत. त्‍यामुळे समाजात अतिशय कठोर संदेश न्‍यायालयाने दिला आहे.