आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपी निवडणूकः राहुल गांधींची प्रतिष्‍ठा पणाला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात मुख्‍यमंत्री मायावती आणि हत्तींचे पुतळे झाकल्‍याची मोठी कवायत केली. परंतु, याचा निवडणुकीच्‍या निकालांवर परिणाम होणार नसल्‍याचा दावा ज्‍येष्‍ठ पत्रकार सत्‍येंद्र राजन यांनी केला आहे. आयोगाचा पुतळे झाकण्‍याचा निर्णय तथ्‍यहीन आणि हास्‍यास्‍पदच आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्‍मक संस्‍था आहे आणि एका ज्‍येष्‍ठ नोकरशाहाच्‍याच हाता याची कमान असते. त्‍यामुळे आयोगाचे निर्णय 'ब्‍युरोक्रॅटींक' असतात.
उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे युवराज आणि सरचिटणीस राहुल गांधी यांची प्रतिष्‍ठा पणाला लागली आहे. त्‍यांनी संपूर्ण लक्ष्‍य उत्तर प्रदेशावर केंद्रीत केले आहे. यासाठी त्‍यांनी बरेच परिश्रमही घेतले आहेत. राहुल गांधी हे मतदारांसाठी एक प्रमुख आकर्षणाचा चेहरा म्‍हणून समोर आले आहेत. परंतु, त्‍याचा कॉंग्रेसला किती फायदा मिळतो, हे निकालानंतरच स्‍पष्‍ट होईल. परंतु, भारतीय जनता पार्टीपेक्षा कॉंग्रेसची स्थिती चांगली राहील.
राज्‍यात सत्ता कोणाकडे जाईल, हे सांगणे कठीण आहे. कारण राज्‍यात चतुरंगी लढत आहे. कॉंग्रेसला गेल्‍या निवडणुकीपेक्षा जास्‍त जागा मिळतील. कॉंग्रेसने जातीय समीकरण विचारात घेऊन तिकीट वाटप केले आहे. याचा कॉंग्रेसला निश्चितच फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांना पुढे करुन कॉंग्रेसला पूर्व उत्तर प्रदेशात फायदा होऊ शकतो. तसेच राष्‍टीय लोकदलचे प्रमुख अजित सिंह यांना सोबत घेतल्‍यामुळे कॉंग्रेसला पश्चिम उत्तर प्रदेशात फायदा होईल. या भागात जाट मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्‍याच प्रमाणे अल्‍पसंख्‍यांकांना आरक्षण देण्‍याच्‍या मुद्यावरुनही कॉंग्रेसला फायदा होऊ शकतो. कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात यावेळी जवळपास 100 जागा मिळण्‍याचा अंदाज आहे.
कॉंग्रेसला होणारा फायदा हा एक प्रकारे मायावतींच्‍या बहुजन समाजवादी पार्टीचे नुकसान आहे. परंतु, समाजवादी पार्टीबद्दल काही सांगता येणे अवघड आहे. या पक्षांमध्‍ये चुरशीची लढत होण्‍याची अपेक्षा आहे. सत्ता स्‍थापनेचा विचार केल्‍यास मायावतींकडे झुकते माप दिसून येत आहे. व्‍यावहारिकरित्‍या मायावतींचे शासन एवढे वाईट नव्‍हते. त्‍यांच्‍या शासनाची एक वेगळी शैली आहे. तसेच भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्यावरुनही त्‍यांना नुकसान होणार नसल्‍याचे दिसून येत आहे. एका सर्वेक्षणानुसार सपाला बसपापेक्षा जास्‍त जागा मिळतील, असा अंदाज व्‍यक्त करण्‍यात आला होता. परंतु, ते वास्‍तविकतेला धरुन नाही. मायावतींचा मतदार अशा सर्वेक्षणात तोंड उघडत नाही किंवा त्‍याच्‍यापर्यंत हे सर्वेक्षण पोहोचत नाही.
सत्तेचा सारीपाट बसपा आणि सपामध्‍येच होण्‍याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेस तिस-या क्रमांकावर राहण्‍याची शक्‍यता आहे. राज्‍यात भाजपचे जनमत घटले आहे. तसेच 90च्‍या दशकातील मंदिर-मस्जिद मुद्दाही प्रभावहीन दिसत आहे. भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्यावर भाजपला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. परंतु, कुशवाहा यांच्‍यासारख्‍या मंत्र्यांना पक्षात घेऊन भाजपचे नुकसान झाले आहे.
कॉंग्रेस तसेच भाजपने मुख्‍यमंत्रीपदासाठी अद्याप कोणत्‍याही नावाची घोषणा केलेली नाही. मुख्‍यमंत्रीपदाच्‍या उमेदवाराची घोषणा केल्‍याचा काही प्रमाणात फायदा होतो. कॉंग्रेसचा विचार केल्‍यास उत्तर प्रदेशात पक्षाचे मोठे संघटन नाही. त्‍यामुळे मतदारांमध्‍ये संभ्रमाची स्थिती राहू शकते. भाजपबाबत बोलायचे झाल्‍यास पक्षाकडे असा कोणता खास चेहरा नाही.
(रंजीत सिंह यांच्‍याशी चर्चेवर आधारीत)
मायावती सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
मायावती व हत्तींचे पुतळे झाकणार, निवडणूक आयोगाचे आदेश
उत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्‍ताव फेटाळल्‍यामुळे मायावती नाराज